आयडियाची जबरदस्त ऑफर, १२६ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉल्स
रिलायन्स जिओच्या टेलिकॉम इंडस्ट्रीतील एन्ट्रीनंतर इतर कंपन्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. त्यामुळे या कंपन्यांकडून ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर दिल्या जात आहेत.
मुंबई : रिलायन्स जिओच्या टेलिकॉम इंडस्ट्रीतील एन्ट्रीनंतर इतर कंपन्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. त्यामुळे या कंपन्यांकडून ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर दिल्या जात आहेत.
अशात आयडियाने त्यांच्या ग्राहकांसाठी एक जबरदस्त ऑफर आणली आहे. आयडियानं हा प्लॅन आपल्या प्री-पेड यूजर्ससाठी आणला आहे. ज्यामध्ये यूजर्सला ८४ दिवसांसाठी १२६ जीबी डेटा मिळणार आहे.
आयडिया सेल्यूलरच्या वेबसाइटवर या प्लॅनची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, या प्लॅनची किंमत ६९९ रुपये आहे. ज्यामध्ये ८४ दिवसांसाठी दररोज १.५ जीबी डेटा यूजर्सला मिळणार आहे. यासोबतच लोकल-एसटीडी अनलिमिटेड कॉलिंगही असणार आहे. एअरटेल आणि जिओनं देखील ८४ दिवसांसाठीचे प्लॅन याआधीच लाँच केले आहेत. ज्यामध्ये यूजर्सला दररोज १ जीबी डेटा मिळतो. पण त्या प्लॅनची किंमत ३९९ रुपये आहे.
जिओनं ३९९ शिवाय ३४९ रुपयांचा आणखी प्लॅन लाँच केला आहे. ज्यामध्ये यूजर्सला ५६ दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंग आणि २० जीबी डेटा मिळत आहे