मुंबई : टेलिकॉम सेक्टरमध्ये देशातली सगळ्यात मोठी कंपनी झाल्यानंतर आता जिओ फायबर सर्विस ५ सप्टेंबरपासून सुरू होईल. गेल्यावर्षी जिओने गीगाफायबर सर्व्हिस सुरू करण्याची घोषणा केली होती आणि आता एक महिन्यात ही सगळ्या युझर्ससाठी उपलब्ध होईल. जिओ फायबरच्या आल्याने BSNL,एअरटेल तसेच इतर कंपन्यांचे नुकसान होऊ शकते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जिओ फायबरचे सगळे प्लान अजून समजले नाहीत, पण कंपनी म्हणाली की, त्याचा बेसिक प्लान ७०० रूपयांचा असेल आणि प्रिमीयम पॅकची किंमत १० हजार रूपये असेल. जिओ फायबरच्या प्लानमध्ये 100Mbps पासून 1Gbps चा स्पीड असेल.


एअरटेलमध्ये हे प्लान उपलब्ध
एअरटेल ब्रॉडबॅंड सर्व्हिसमध्ये ४ प्लान ऑफर करत आहे. एअरटेलच्या बेसिक प्लानमध्ये 40Mpbs स्पीडसोबत 100GB डेटा एक महिन्यासाठी मिळतो. 


खरंतर कंपनी या प्लानला ६ महिन्यासाठी 200GB अतिरिक्त डेटा देत आहे, आणि १,०९९ रुपयांच्या प्लानमध्ये एका महिन्यासाठी 300GB डेटा सोबत 500GB बोनस डेटा मिळतो. 


या प्लानमध्ये 100mbps चा स्पीड उपलब्ध आहे. १,५९९ रुपयाच्या प्लानमध्ये यूझर्सला 600GB डेटा सोबत 1000GB बोनस डेटा उपलब्ध केला जाणार आहे.


BSNL चे प्लान्स
BSNL ब्रॉ़डबॅंड सर्व्हिसमध्ये आपल्या यूझर्सला ७७७ रूपयांपासून १६ हजार ९९९ रूपयांपर्यंतचे प्लान ऑफर केले आहेत. बीएसएनएलचा बेसिक प्लान 50Mbps चा स्पीड उपलब्ध केला आहे, परंतू यात 500GB डेटाची लिमिट आहे. १ हजार २७७ रुपयाच्या प्लान 100Mbps च्या स्पीडसोबत 750GB डेटा दिला जाणार आहे.