नवी दिल्ली : रिलायन्स जिओने ४जी डाऊनलोड स्पीडच्या बाबतीत ऑक्टोबर महिन्यातही पहिला क्रमांक पट्कावला आहे. कंपनीकडून लागोपाठ सर्वात जास्त डाऊनलोड स्पीड देण्याचा हा दहावा महिना आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण(ट्राय)च्या ताजे आकडेवारीनुसार, ऑक्टोबरमध्ये जिओची सरासरी ४जी डाऊनलोड स्पीद २१.८ एमबीपीएस आहे. असे करणारी ही पहिली भारतीय कंपनी आहे. 


कुणाचा किती स्पीड?


वोडाफोन इंडिया ऑक्टोबरमध्ये ९.९ एमबीपीएसच्या सरासरी ४जी डाऊनलोद स्पीडने दुस-या स्थानावर, भारती एअरटेल ९.३ एमबीपीएससोबत तिस-या आणि आयडिया ८.१ एमबीपीएसच्या सरासरीने ४जी डाऊनलोड स्पीडसोबत चौथ्या स्थानावर आहे. ऑक्टोबर महिन्यात आयडिया तिस-या आणि एअरटेल चौथ्या स्थानावर होते.


एअरटेलचा डाऊनलोड स्पीड सुधारला


आकडेवारी बघितली तर एअरटेल नेटवर्कवर सरासरी ४जी डाऊनलोड स्पीडमध्ये बराच सुधार आलाय. गेल्या महिन्यात ७.५ एमबीपीएस स्पीडच्या तुलनेत या महिन्यात ९.३ एमबीपीसच्या सरासरीने स्पीड नोंदवली गेली आहे. 


जिओ आणि एअरटेल मागेपुढे


नव्या वर्षात ४जी स्पीडच्या बाबतीत बीएसएनएलचीही आकडेवारी पाहिली जाईल. कारण कंपनी जानेवारीत ४जी नेटवर्क सुरू करणार आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात ४जी स्पीडच्या बाबतीत कोणताही बदल झालेला नाही. ४जी अपलोड स्पीडच्या बाबतीत आताही आयडिया ७.१ एमबीपीएससोबत टॉपवर आहे. वोडाफोन ६.२ एमबीपीएसच्या स्पीडसोबत दुस-या स्थानावर आहे. रिलायन्स जिओ आणि एअरटेल क्रमश: ४.९ एमबीपीएस आणि ३.९ एमबीपीएसच्या सरासरीने ४जी अपलोड स्पीडसोबत तिस-या स्थानावर आणि चौथ्या स्थानावर आहे.