Jio in flight converting pack : विमानातून प्रवास करताना विमानाने उंच झेप घेतली का मोबाईलचे नेटवर्क निघून जाते. मोबाईलला जर नेटवर्क नसेल तर आपण कंटाळून जातो. मात्र आता रिलायन्स जिओने असा एक रिजार्ज प्लॅन आणला आहे. ज्यामुळे विमान जरी २० हजार फूट उंचीवर असलात तरी तुमच्या मोबाईलमध्ये फुल नेटवर्क असणार आहे. या प्लॅनचे कोणते फायदे आहेत आणि त्याची किंमत किती आहे ते जाणून घ्या...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जिओ इन फ्लाइट कनेक्टिव्हिटी पॅक (jio in flight converting pack)


जिओ इन फ्लाइट कनेक्टिव्हिटी पॅक काय आहेत असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. जेव्हा तुम्ही २० हजार फूट उंचीवर विमानात असता तेव्हा जिओचा हा प्लॅन वापरा. 500 रुपयांपेक्षा कमी किमतीपासून सुरू होणाऱ्या या प्लॅनमध्ये आउटगोइंग कॉल, मोफत एसएमएस आणि इंटरनेट दिले जात आहेत.


जिओचा ४९९ रुपयांचा प्लॅन


499 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला 100 मिनिटे, 250MP इंटरनेट आणि आउटगोइंग कॉलसाठी 100 एसएमएस सुविधा उपलब्ध असेल. या प्लॅनमध्ये इनकमिंग एसएमएस मोफत आहेत पण इनकमिंग कॉल नाही. या प्लॅनची वैधता एक दिवसाची आहे. इंटरनेटचा वेग एअरलाइनवर अवलंबून असतो.


जिओचा 699 रुपयांचा इन-फ्लाइट प्लॅन


जिओच्या या इन-फ्लाइट कनेक्टिव्हिटी प्लॅनमध्ये एका दिवसासाठी 500MB डेटा, 100 SMS आणि आउटगोइंग व्हॉईस कॉलिंग सुविधा देण्यात आली आहे. या प्लॅनमध्ये इनकमिंग कॉल्स देखील प्रतिबंधित आहेत. परंतु इनकमिंग एसएमएस विनामूल्य आहेत. 499 रुपयांच्या प्लॅनमध्ये इंटरनेट स्पीड देखील एअरलाइनवर अवलंबून असेल. जिओच्या या प्लॅनची वैधता देखील इतर प्लॅनप्रमाणे एक दिवसाची आहे. 


यामध्येही जिओ आपल्या ग्राहकांना इनकमिंग एसएमएस सुविधा देत आहे. परंतु येथे इनकमिंग कॉल्सवरही बंदी आहे. या प्लॅनचे फायदे म्हणजे 100 मिनिटे आउटगोइंग कॉल, 1GB मोबाइल डेटा आणि 100 SMS सुविधा. या प्लॅनमध्ये उपलब्ध असलेल्या इंटरनेट स्पीडवर एअरलाइन ते एअरलाइन अवलंबून असेल.


ही योजना कशी सुरू करणार?


विमानात उंचावर गेल्यावर तुमच्या फोनवर एअरप्लेन मोड टाकावा लागेल. येथे तुमचा फोन सहसा स्वतःला AeroMobile नेटवर्कशी कनेक्ट करेल. परंतु तसे झाले नाही तर तुम्हाला फोनच्या सेटिंग्जमध्ये दिलेल्या 'कॅरिअर' पर्यायावर जावे लागेल आणि मॅन्युअली एरोमोबाइल नेटवर्क निवडावे लागेल. डेटा रोमिंगचा पर्याय चालू ठेवण्यास विसरू नका. इन-फ्लाइट कॉल करण्यासाठी, तुम्हाला नंबरच्या आधी '+' आणि देश कोड प्रविष्ट करणे आवश्यक आहे. सध्या या योजना भारतीय हवाई क्षेत्रात वापरल्या जाऊ शकत नाहीत आणि ते प्रत्येक एअरलाइनवर काम करत नाहीत. एअरलाइन्सची यादी जिओच्या वेबसाइटवर आढळू शकते.