जिओ देतेय १० जीबी फ्री डेटा, नाही मिळाला तर डायल करा हा नंबर
रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी खास ऑफर आणलीये. या ऑफर अंतर्गत ग्राहकांना १० जीबी डेटा फ्री दिला जातोय. दरम्यान, कंपनी हा फ्री डेटा जिओ टीव्ही यूजर्सला देतेय. यासोबतच हा फ्री डेटा काही विशिष्ट ग्राहकांनाच दिला जातोय.
मुंबई : रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी खास ऑफर आणलीये. या ऑफर अंतर्गत ग्राहकांना १० जीबी डेटा फ्री दिला जातोय. दरम्यान, कंपनी हा फ्री डेटा जिओ टीव्ही यूजर्सला देतेय. यासोबतच हा फ्री डेटा काही विशिष्ट ग्राहकांनाच दिला जातोय.
जर तुम्हाला ही ऑफर मिळेल की नाही हे जाणून घ्यायचे असेल तर जिओ अॅपमध्ये आपला प्लान चेक करा. याशिवाय तुम्ही एक नंबर डायल करुनही या ऑफरबाबत माहिती मिळवू शकता.
कंपनीने ट्विट करुन या ऑफरची माहिती दिलीये. जिओकडून फ्री दिल्या जाणाऱ्या या डेटाचा वापर जिओ टीव्ही अॅपवप स्ट्रीमिंगसाठी केला जाऊ शकतो. या प्लनची व्हॅलि़डिटी २७ मार्चपर्यंत असेल.
अॅपद्वारे अशी मिळवा माहिती
सगळ्यात आधी माय जिओ अॅपमध्ये जा आणि आपल्या नंबरने साईन इन करा. यात माय वाऊचरमध्ये तुम्हाला माहिती मिळेल की तुम्हाला फ्री डेटा मिळतोय की नाही. जर तुम्हाला ही ऑफर मिळत नाहीये तर कंपनीच्या टोल फ्री नंबर १२९९वर डायल करुन याबाबतची माहिती मिळवू शकता.
या कारणामुळे कंपनी देतेय फ्री डेटा
जिओने केलेल्या ट्विटनुसार, जिओ टीव्हीने मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये बेस्ट मोबाईल व्हिडीओ कन्टेंटमध्ये ग्लोबल मोबाईल अॅवॉर्ड्स २०१८ जिंकलाय. यामुळे ग्राहकांना १० जीबी डेटा फ्री दिला जात आहे.