मुंबई : Jio Unlimited Plan : रिलायन्स जिओने आता कमी खर्चात अधिक फायदे देण्याचा चंग बांधला आहे. Jio कडे असे अनेक प्लान आहेत. (Reliance Jio Recharge Plans), ज्यामध्ये अधिक डेटा आणि अमर्यादित कॉलिंग उपलब्ध आहे. आज आम्ही तुम्हाला Jio च्या 200 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या प्लानबद्दल सांगणार आहोत. (Jio Plan Under Rs 200), ज्यामध्ये 1 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि अनेक सुविधा मिळत आहेत.  


 जिओचा 186 रुपयांचा प्लान


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

JioPhone च्या 186 रुपयांच्या प्लानमध्ये युजरला 28 दिवसांची वैधता मिळते. तसेच, या प्लानमध्ये दररोज 1GB डेटा मिळतो. म्हणजेच प्लानमध्ये एकूण 28 जीबी डेटा देण्यात आला आहे. दिवसाचा डेटा संपल्यानंतर, इंटरनेटचा वेग कमी होऊन 64 Kbps होतो. म्हणजेच रोजचा डेटा संपल्यानंतरही इंटरनेट मिळेल. मात्र, त्याचा वेग असणार नाही.


मोफत कॉलिंग, दररोज 100 SMS


डेटा व्यतिरिक्त, ग्राहकाला 186 रुपयांच्या प्लानमध्ये अमर्यादित कॉलिंगची सुविधा मिळत आहे. ग्राहक कोणत्याही नेटवर्कवर मोफत कॉल करु शकतात. तसेच यूजर्सला दररोज 100 एसएमएस करता येऊ शकतात. याशिवाय प्लानमध्ये जिओ मूव्ही, जिओ सिक्युरिटी, जिओ क्लाउडचे फ्री सब्सक्रिप्शन दिले आहे.