Jio 5G Smartphone: तंत्रज्ञानात झपाट्याने बदल होत असून आता सर्वांना वेध लागले आहे 5G सेवेचे. भारतातील काही शहरात 5G सेवा सुरु झाली आहे. मात्र सेवा सुरु झाली असली तरी अनेकांकडे 5G सेवेला सपोर्ट करणारा तसा स्मार्टफोन नाही. त्यामुळे अनेक जण स्वस्त आणि मस्त स्मार्टफोनच्या शोधात आहेत. नुकतंच रिलायन्स जिओनं भारतात स्मार्टफोन लाँच केला जाईल, अशी घोषणा केली होती. मात्र कधी लाँच होईल याबाबत सांगण्यात आलेलं नाही. असं असलं तरी गीकबेंचवर या स्मार्टफोनबाबत माहिती समोर आली आहे. माहितीनुसार हा स्मार्टफोन स्वस्त असून यात जबरदस्त फीचर्स असणार आहेत. चला जाणून घेऊयात Jio Phone 5G स्मार्टफोनच्या किंमत आणि फीचर्सबाबत...


Jio Phone 5G लवकरच होणार लाँच


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गीकबेंचवर मॉडेल नंबर LS1654QB5 दिसला असून हा Jio Phone 5G असल्याचं सांगितलं जात आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन SoC कोडनेम होलीपासून पॉवर घेईल. हा स्नॅपड्रॅगन 480+SoC आहे. या स्मार्टफोनमध्ये 4GB RAM आणि 64GB स्टोरेज असणार आहे. फोन अँड्रॉइड 12 सह येणार आहे. यात टॉपमध्ये जिओ PragatiOS असू शकते. अनेक भाषांना सपोर्ट करेल. गीकबेंचच्या सिंगल कोर टेस्टमध्ये फोनला 549 स्कोर मिळाला आहे. मल्टी-कोर टेस्टमध्ये 1661 चा स्कोर मिळाला आहे. कंपनीने अजून फीचर्स आणि स्पेसिफिकेशनबाबत सांगितलेलं नाही. तरी फीचर्सची माहिती लीक्समधून समोर आली आहे.


बातमी वाचा- Samsung च्या नव्या तंत्रज्ञानाबाबत उत्सुकता, Finger Print स्कॅनरबाबत नवं अपडेट


JiO Phone 5G Specification


लीक झालेल्या रिपोर्टनुसार, Jio Phone 5G मध्ये 6.5 इंचाचा डिस्प्ले असेल. त्यात 90HZ चा रिफ्रेश रेट आहे. फोनमध्ये 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000 mAh सह बॅटरी असेल. फोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप असेल. यात 13MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 2MP चा सेकंडरी कॅमेरा असेल. फोनला सेल्फीसाठी 8MP चा कॅमेरा असेल.