Samsung च्या नव्या तंत्रज्ञानाबाबत उत्सुकता, Finger Print स्कॅनरबाबत नवं अपडेट

Finger Print Scanner: फिंगरप्रिंट स्कॅनर फीचर हल्ली प्रत्येक स्मार्टफोनमध्ये दिलं जात आहे. काही कंपन्या हे फीचर डिस्प्लेमध्येच देतात. पण यापुढे जात सॅमसंग फिंगरप्रिंट स्कॅन करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान घेऊन येत आहे. यामुळे स्मार्टफोन वापरण्याचा अनुभव बदलेल.

Updated: Dec 7, 2022, 03:14 PM IST
Samsung च्या नव्या तंत्रज्ञानाबाबत उत्सुकता, Finger Print स्कॅनरबाबत नवं अपडेट title=

Samsung Finger Print Scanner: सॅमसंगच्या नव्या तंत्रज्ञानाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. इनडिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरचा (Finger Print Scanner) वापर करून गेली काही वर्षे स्मार्टफोन वापरला जात आहे. स्मार्टफोन अनलॉक करण्यासाठी स्मार्टफोनच्या डिस्प्लेजवळ एका खास जागी फिंगरटिप असते. ठसे स्कॅन केल्यानंतर स्मार्टफोन (Smartphone) अनलॉक होतो. आता या तंत्रज्ञानानं आणखी उंची गाठली आहे. सॅमसंगनं हे तंत्रज्ञान आणखी विकसित केल्याचा दावा केला आहे. लवकरच नवं तंत्र येणाऱ्या स्मार्टफोनमध्ये दिसणार आहे. इंटरनॅशनल मीटिंग ऑफ डिस्प्ले इन्फॉर्मेशननुसार सॅमसंगने (Samsung) आपल्या ऑल-इन-वन ओलेड 2.0 डिस्प्ले आणण्याची घोषणा केली आहे. या प्लान अंतर्गत सॅमसंग नव्या पिढीच्या स्मार्टफोनमध्ये OLED 2.0  ऑल-इन-वन फिंगरप्रिंट सेंसिंगवर काम करत आहे.

काय आहे सॅमसंगचं नवं तंत्रज्ञान

गॅलेक्सी स्मार्टफोन आणि टॅबलेटच्या OLED डिस्प्लेवर एकानंतर एक काही फिंगरप्रिंट स्कॅन करण्याची क्षमता असणार आहे. या तंत्रज्ञानानुसार पूर्ण स्क्रिनवर कुठेही टच केलं की अनलॉक होणार आहे. त्यामुळे फोनला टच करताच अनलॉक होणार आहे. हे तंत्रज्ञान फिंगरप्रिंटच्या तुलनेचे सुरक्षित असल्याचं सांगितलं जात आहे.

बातमी वाचा- Sedan Car चं मार्केट भारतातून संपतंय का? नेमकं कारण काय? जाणून घ्या 

सॅमसंगचं नवं तंत्र कधीपर्यंत स्मार्टफोनमध्ये येईल याबाबत माहिती नाही. मात्र ओपीडी (ऑर्गेनिक फोटो डायोड) मल्टी-फिंगरप्रिंट स्कॅनिंग तयार झालं आहे. हे नवं तंत्रज्ञान 2025 ला लाँच केलं जाण्याची शक्यता आहे.