मुंबई : रिलायन्स जिओच्या 4G फिचर फोनची डिलिवरी या आठवड्यात सुरू होणार आहे. कंपनीचे चेअरमन मुकेश अंबानीने फोनच्या लाँचिंग वेळी म्हटलं होतं की, फोन सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून मिळण्यास सुरूवात होत आहे. म्हणजे ज्या युझर्सनी फोनची बुकिंग केली आहे त्यांना ७ दिवसांत हा फोन मिळेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका मीडिया रिपोर्टनुसार, ही डिलिवरी देशातील सर्वात मोठ्या अशा ५ शहरांत सर्वप्रथम होणार आहे. यामुळे बुकिंगचा लोड कमी होण्यास मदत होईल. जिओचे फोन ताइवानमधून येणार असून वेगवेगळ्या शहरात पाठवले जाणार आहेत. अंबानी यांनी सांगितलं होतं की त्यांचं प्रत्येक सप्ताहातील टार्गेट हे ५० लाख हँडसेट इतकं असणार आहे. 


सर्वात प्रथम या फोनची डिलिवरी मोठ्या शहरांमध्ये होणार आहे. दिल्ली, मुंबई, कोलकाता, हैद्राबाद आणि अहमदाबाद या शहरांचा समावेश आहे. या ५ शहरांमध्ये फोन पोहोचल्यानंतर ते जिओ सेंटर आणि जिओ स्टोरवर देण्यात येणार आहेत. आणि यानंतर रिटेल स्टोर्स आणि डिलर्सकडे हे फोन पाठवले जाणार आहेत.