मुंबई : रिलायन्स जिओनं आतापर्यंतचा सगळ्यात स्वस्त स्मार्टफोन बाजारामध्ये आणला आहे. पण या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅप चालणार नाही अशी माहिती एका हिंदी वेबसाईटनं दिली आहे. या स्मार्टफोनमध्ये प्रिलोडेड अॅप्स असतील पण व्हॉट्सअॅप मात्र देण्यात आलेलं नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फेब्रुवारी २०१७च्या आकडेवारीनुसार भारतामध्ये २० कोटी व्हॉट्सअॅप यूजर्स आहेत. त्यामुळे बाकीच्या यूजर्सना लक्ष्य करण्यासाठी जिओ त्यांच्या स्वत:चा चॅट प्लॅटफॉर्म आणणार आहे. याच कारणासाठी जिओच्या या फोनमध्ये व्हॉट्सअॅप वापरता येणार नाही.


अवघ्या पंधराशे रुपयात हा स्मार्ट फोन ग्राहकांना मिळणार असून हे पंधराशे रुपये तीन वर्षानंतर ग्राहकाला परत देण्यात येतील.  त्याशिवाय रिलायन्स जिओच्या फोनवर अनलिमिटेड डेटा मोफत देण्यात येणार आहे.


येत्या १५ ऑगस्टपासून या बम्पर ऑफरची सुरूवात होणार आहे. सप्टेंबरपर्यंत देशात जिओचे १० हजार सेंटर असतील. जिओ येत्या वर्षभरात भारताच्या ९९ टक्के जनतेपर्यंत पोहचलेली असेल, असा दावा मुकेश अंबानींनी केला आहे.


काय आहेत जिओ 4G स्मार्टफोनची फिचर्स 


- टचस्क्रीन शिवाय असणाऱ्या या फोनमध्ये अल्ट्रा-अपोर्डेबल फोरजी वोल्ट असेल


- जिओच्या नेटवर्कवरच हा फोन उपलब्ध असेल


- यात इंटरनेट टिथरिंग, व्हिडिओ कॉलिंग आणि जिओ कंटेंट सारखे व्हिडिओ पाहण्यासची सुविधा असेल.


- या हँडसेटवर सबसिडीही दिली जाईल आणि कस्टम ओएस आणि अॅप मार्केटप्लेसची सुविधाही मिळेल


- भारतीय भाषांच्या वापरासाठी यात डिजिटल व्हॉईस फिचरही असेल


- २.४ इंचाचा कलर डिसप्ले असेल


- ५१२ एमबी रॅम आणि ४ जीबी इंटरनल स्टोअरेज असेल... मायक्रो एसडी कार्डच्या साहाय्यानं १२८ जीबीपर्यंत वाढवता येईल


- या फिचर फोनमध्ये ड्युएल नॅनो सिमचा स्लॉट असेल


- २ मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि VGA फ्रंट कॅमेरा


- यात २००० mAH बॅटरीसोबत एफएम रेडिओ आणि ब्लूटूथ ४.१ सारखे फिचर असतील