Jio ने युजर्सला दिला मोठा झटका! `या` स्वस्त प्लॅन्सचे दर कडाडले; जाणून घ्या नवीन किंमती
जर तुम्ही जिओ ग्राहक असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. जिओने आपले काही लोकप्रिय स्वस्त प्लॅन महाग केले आहेत.
मुंबई : JioPhone Plans Price Hike 2022 Check Updated List: आजच्या काळात स्मार्टफोनचा वापर न करणारी व्यक्ती क्वचितच असेल! जर तुम्ही रिलायन्स जिओचे यूजर असाल तर Jio ने आपल्या काही प्लॅनच्या किंमती 20 टक्क्यांपर्यंत वाढवल्या आहेत. कंपनीने कोणत्या प्लॅन्सच्या किंमती वाढवल्या आहेत आणि त्यांची नवीन किंमत काय आहे ते जाणून घेऊया.
जिओने हे प्लॅन केले महाग
जिओने आपल्या रिचार्ज प्लॅनची किंमत वाढवली आहे. काही काळापूर्वी Jio ने JioPhone नावाचा स्वतःचा स्वस्त फीचर फोन लॉन्च केला होता.
जिओ फोन वापरकर्त्यांना कंपनी काही खास योजना ऑफर करते. जिओने तिन्ही जिओफोन रिचार्ज प्लॅनच्या किंमती वाढवल्या आहेत. हे तिन्ही प्लॅन आतापर्यंत 20% च्या सवलतीत दिले जात होते, परंतु आता ती ऑफर काढून टाकण्यात आली आहे. ज्यामुळे रिचार्ज प्लॅन महाग झाले आहेत.
155 रुपयांचा प्लॅन 186 रुपयांचा
JioPhone चा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन, ज्याची किंमत 155 रुपये होती. ती 186 रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला 28 दिवसांसाठी दररोज 1GB डेटा, कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस दिले जात आहेत.
185 रुपयांच्या प्लॅनची किंमतही वाढवल्या
185 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनची किंमत आता 222 रुपयांवर गेली आहे. हा प्लॅन दररोज 2GB डेटा, कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 SMS च्या फायद्यांसह येतो. दैनंदिन डेटा संपल्यानंतर इंटरनेट स्पीड 64Kbps पर्यंत कमी होईल. या प्लॅनची वैधता देखील 28 दिवसांची आहे.
749 रुपयांचा टॉप-एंड प्लॅन 899 रुपयांचा
JioPhone रिचार्ज प्लॅनमधील सर्वात महाग आणि सर्वोत्कृष्ट प्लॅन आता 899 रुपयांमध्ये उपलब्ध आहे, तर आधी या प्लॅनची किंमत 749 रुपये होती. या प्लॅनमध्ये तुम्हाला 336 दिवसांची वैधता दिली जात आहे. या दरम्यान तुम्ही 24GB डेटा वापरू शकता.
हा प्लान 28 दिवसांसाठी 2GB डेटा देतो आणि त्यानंतर दर 28 दिवसांनी त्याचे रिन्यू केले जाते. या प्लॅन्समध्ये दर 28 दिवसांसाठी 50 एसएमएस आणि फ्री व्हॉइस कॉलिंग सारखे फायदे देखील आहेत आणि तुम्हाला यामध्ये कंटेंट आणि सेवा ऑफर देखील दिल्या जातात.