३१ मार्चला संपणार जिओची प्राईम मेंबरशिप, पुढे काय होणार
रिलायंस जिओने सुरुवातीला फ्री सेवा देत धमाका केला होता. ६ महिने ही फ्री सेवा ग्राहकांना देण्यात आली होती त्यानंतर जिओने ९९ रुपयांची में लाँच केली होती. या मेंबरशिपची वॅलिडीटी १ वर्ष होती. जिओ प्राईम मेंबरशिपची सुरुवात १ एप्रिल २०१७ला झाली होती. १ मार्च २०१८ पर्यंत त्याची मुदत आहे.
मुंबई : रिलायंस जिओने सुरुवातीला फ्री सेवा देत धमाका केला होता. ६ महिने ही फ्री सेवा ग्राहकांना देण्यात आली होती त्यानंतर जिओने ९९ रुपयांची में लाँच केली होती. या मेंबरशिपची वॅलिडीटी १ वर्ष होती. जिओ प्राईम मेंबरशिपची सुरुवात १ एप्रिल २०१७ला झाली होती. १ मार्च २०१८ पर्यंत त्याची मुदत आहे.
आता सब्सक्रिप्शनची तारीख संपणार आहे. त्यामुळे आता लवकरच नवीन घोषणा होऊ शकते. पण याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही. पण अशी आशा आहे की कंपनी प्राईम सब्सक्रिप्शन पूर्णपणे बंद करुन नवीन ऑफर आणू शकते. काही नवीन ऑफर देखली कंपनी आणू शकते. जिओने याआधी देखील आपल्या ग्राहकांसाठी सरप्राईज ऑफर आणल्या आहेत. टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये गेम चेंजर बनलेली जिओ कंपनी आता काय घोषणा करते याबाबत सगळ्यांनाच उत्सूकता आहे.
अजून तरी कोणतीही घोषणा झालेली नाही. येत्या २ ते ३ दिवसात जिओकडून काही अधिकृत घोषणा होऊ शकते.