Jio Recharge Plan : Jio ने आपल्या यूजर्ससाठी (Jio Recharge ) अनेक नवीन प्लान आणले आहेत. या प्लानमध्ये रोज डेटा मिळतो. याचा वापर तुम्ही सहज करु शकता. जियोचे रोज 3 जीबी डेटा मिळणारे प्लान खूप आहेत. या प्लान्सची किंमत आणि कोणते फायदे तुम्हाला मिळू शकतात ते जाणून घ्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या क्रिकेटचा हंगाम सुरू आहे. या हंगामात जिओच्या प्लानची सर्वात जास्त मागणी आहे. जिओच्या (Jio Recharge ) 219 रुपयांच्या प्लॅनचा समावेश आहे. खरं तर, आयपीएल हंगामात वापरकर्ते अधिक डेटा वापरतात. यासाठी जिओने युजर्ससाठी 219 रूपयाचा रिचार्ज प्लॅन आणला आहे. आला आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सच्या डेटासोबत अनलिमिटेड कॉलिंग देखील दिले जाते. 


जिओ प्लानमध्ये युजर्सना दररोज ३ जीबी डेटा दिला जातो. हा प्लान एकूण 14 दिवसांच्या वैधतेसह येतो. Jio वापरकर्त्यांप्रमाणे, प्लॅनमध्ये एकूण 44 GB डेटा उपलब्ध आहे. यात दररोज 3 GB डेटा आणि 2 GB अतिरिक्त डेटा दिला जातो. सोबत या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा देण्यात आली आहे. या प्लॅनमध्ये दररोज 100 फ्री एसएमएसची सुविधा आहे. 


तसेच  Jio TV, Jio Cinema, Jio Security आणि Jio Cloud सुविधा या प्लॅनमध्ये देण्यात आल्या आहेत. या प्लॅनमध्ये, तुम्ही Jio सिनेमा आणि मोफत IPL सोबत Jio TV आणि चित्रपट आणि शो देखील पाहू शकता.


कोणती योजना सर्वोत्तम


जर तुम्ही या प्लॅनला दोन वेळेस रिचार्ज केल्यात तर तुम्हाला 438 रुपये द्यावे लागतील. याचप्रमाणे 28 दिवसासाठी एकूण 88 GB डेटा मिळेल. परंतु, तुम्ही एकाच वेळी 28 दिवसांसाठी रिचार्ज केलात तर तुम्हाला  399 रुपयांमध्ये मध्ये दररोज 3 जीबी डेटा मिळेल आणि एकूण डेटा 90 जीबी असेल. तुम्हाला अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस सुविधा मिळेल.


1.5 जीबी डेटासह जिओ सर्वोत्तम योजना


Jio ग्राहकांसाठी दररोज 1.5 GB डेटासह अनेक रिचार्ज प्लॅन देते. यामध्ये 199, 239, 259, 479, 666 आणि 2545 रुपयांच्या प्लॅनचा समावेश आहे. जिओच्या 199 रुपयांच्या प्लॅनची ​​वैधता 23 दिवस आहे. तसेच जिओचा 239 रुपयांचा प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह उपलब्ध आहे. Jio Rs 259 चा प्लॅन एक महिन्याच्या वैधतेचा, Jio Rs 666 चा प्लॅन 56 दिवसांच्या वैधतेसह दोन महिन्यांसाठी. तसेच, जिओचा 2545 रुपयांचा प्लॅन एकूण 336 दिवसांच्या वैधतेसह येतो.