मुंबई : एकीकडे रिलायन्स जिओने अलीकडेच आपल्या रिचार्ज प्लॅनच्या किंमती वाढवल्या आहेत, ज्यामुळे ग्राहकांच्या खिशाला चिमटा बसत आहे.  परंतु असे असुनही Jio आपल्या वापरकर्त्यांना अनेक फायदे प्रदान करण्यात मागे राहात नाही. रिलायन्स जिओकडे अशा अनेक योजना आहेत, ज्या तुम्हाला बंपर डेटा आणि कॉलिंग ऑफर करतात. एवढेच नाही तर हा प्लॅन Airtel-Vi ला टक्कर देण्यासाठी देखील पुरेसा आहे. आज आम्ही तुम्हाला रिलायन्स जिओच्या 249 रुपयांसोबत 239 रुपयांच्या प्लॅनबद्दल सांगणार आहोत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जिओच्या या दोन प्लॅनमध्ये काय फरक आहे, याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या दोन प्लॅनमध्ये फक्त 10 रुपयांचा फरक आहे. चला जाणून घेऊया दोन्ही योजनांबद्दल!


Jio च्या 249 च्या प्लॅनबद्दल बोलायचे झाले तर, या प्लानमध्ये तुम्हाला Jio कडून दररोज 2GB डेटा ऑफर केला जातो. या प्लॅनमध्ये तुम्हाला अमर्यादित कॉलिंगचाही फायदा मिळतो. एवढेच नाही तर जिओ तुम्हाला या प्लॅनमध्ये 23 दिवसांची वैधता देते.


आता ही वैधता बघितली तर तुम्हाला एकूण 46GB डेटा ऑफर केला जात आहे. मात्र, एवढेच नाही तर या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 100 एसएमएस देखील दिले जात आहेत. तसेच या प्लॅनमध्ये तुम्हाला जिओच्या अॅप्सचा पूर्ण प्रवेश देखील दिला जात आहे.


RELIANCE JIO चा 239 रुपये किमतीचा प्रीपेड प्लॅनमध्ये Reliance Jio ने दररोज 1.5GB डेटा ऑफर केला आहे, याचा अर्थ प्लॅनमध्ये 28 दिवसांच्या वैधतेसाठी तुम्हाला एकूण 42GB डेटा ऑफर केला जात आहे.


याशिवाय, प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग आणि 100 दररोज मोफत एसएमएस देखील मिळतात. इतकेच नाही तर या प्लॅनमध्ये तुम्हाला Jio च्या सर्व अॅप्सचा मोफत प्रवेश देखील मिळतो.