150 रुपयांनी स्वस्त झाला Jio चा 3 महिन्यांचा रिचार्ज, कसं ते जाणून घ्या
जिओ रिचार्ज नेहमीच चर्चेत असतात. कंपनी वेळोवेळी रिचार्ज प्लॅनमध्ये बदल करत असते.
मुंबई : सुरवातील इंटरनेट फ्री असल्यामुळे बहुतांश लोकांनी आपला सिम JIO मध्ये पोर्ट केला, तर अनेकांनी JIO चे नवीन कार्ड देखील घेतले गेले. ज्यामुळे फार कमी वेळातच JIO ला टेलिकम्यूनिकेशन मार्केटमध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित करता आलं. आता JIO चं इंटरनेट फ्री नसलं तरी देखील बहुतांश लोक हा सिमकार्ड वापर आहेत. कारण कंपनी नेहमीच आपल्या ग्राहकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी प्रयत्न करत असते.
आता देखील कंपनेनी रिजार्जवर ग्राहकांना काही सुट दिली आहे. जिओ रिचार्ज नेहमीच चर्चेत असतात. कंपनी वेळोवेळी रिचार्ज प्लॅनमध्ये बदल करत असते. पण जर तुम्हाला कोणी सांगितले की जिओच्या प्लॅनवर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट आहेत, तर तुम्ही त्यावर विश्वास ठेवाल का? पण ते शक्य आहे.
जिओ रिचार्जवर तुम्हाला सहज सूट मिळेल. यासाठी तुम्हाला फार काही करण्याचीही गरज नाही. चला तर मग याबद्दल सविस्तर जाणून घेऊ या.
Jio ने 84 दिवसांसाठी नवीन प्लान लाँच केला आहे. कंपनीने याचे नाव Jio 666 प्रीपेड प्लान ठेवले आहे. आता आपण सर्वात जास्त कशाची वाट पाहत आहात याबद्दल बोलूया. म्हणजेच या रिचार्जवर मिळणाऱ्या सवलतीबद्दल. पेटीएमवर बंपर ऑफर सुरू आहे. तुम्ही या ऑफर अंतर्गत रिचार्ज खरेदी केल्यास तुम्हाला खूप मोठी सूट मिळू शकते.
जर तुम्ही विचार करत असाल तर तुम्हाला यात सूट कशी मिळेल? तर आम्ही तुम्हाला सांगतो की, यासाठी तुम्हाला एक प्रोमो कोड लागेल. पण प्रोमो कोडच्या यादीत फक्त तेच दिसतील ज्यांच्या नंबरवर ही ऑफर लागू होईल. यासाठी तुम्ही प्रथम प्रोमो कोड लिस्ट पाहावी. जी तुम्हाला पेटीएमवर दिसेल आणि तो प्रोमो कोड तुम्हाला ऍप्लिकेबल झाला, तर समजा की, तुम्हाला डिस्काउंट मिळालाच.
आता जिओच्या 84 दिवसांच्या प्रीपेड प्लॅनबद्दल जाणून घेऊ
तुम्हाला Jio 666 प्रीपेड प्लॅनमध्ये 84 दिवसांची वैधता मिळते. यासोबतच तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग आणि एसएमएसची सुविधा मिळते. तसेच, या प्लानची खासियत म्हणजे यामध्ये दररोज 1.5GB डेटा मिळतो. याशिवाय या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 100 एसएमएस देखील मिळतात. हे रिचार्ज केल्यानंतर तुम्हाला ३ महिने रिचार्ज करण्याची गरज नाही.