Jio कडून स्पेशल ऑफर लाँच, युजर्स म्हणतायेत Jio धनधनाधन...
Jio Calender Month Validity Plan : Jio ने नुकतेच रु. 259 चा कॅलेंडर मंथ प्लॅन लाँच. युजर्सना आता आपल्या रिचार्ज प्लॅन संपण्याची वेगवेगळी तारीख लक्षात ठेवण्याची गरज पडणार नाही. ज्या तारखेला जीओ रिचार्ज केलेला असेल त्याच तारखेला पुढील रिचार्ज करावा लागेल.
Jio Calender Month Validity Plan : टेलिकॉम कंपन्यांमध्ये स्वस्त रिचार्ज प्लॅनबाबत कायम स्पर्धा असते. ग्राहक त्यांच्या सोयीनुसार कमीत कमी किमतीचा प्लॅन शोधतात. ग्राहकांना त्यांचा रिचार्ज प्लॅन कधी संपणार याची काळजी करायची गरज पडणार नाही.
Jio आपल्या ग्राहकांसाठी 'calender month validity' हा प्लॅन लॉंच करत आहे. यामध्ये युजर्सना अनेक अमर्याद फायदे मिळणार आहेत. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत नेमका काय आहे कॅलेंडर मंथ प्लॅन.
जिओने नुकताच 259 रुपयांचा कॅलेंडर मंथ प्लॅन लॉंच केला आहे. असा प्लॅन जो, युजर्सना महिन्याला फक्त एक रिचार्ज तारीख लक्षात ठेवण्यास मदत करेल. उदाहरणार्थ, जर जून महिना 30 दिवसांचा असेल तर हा प्लॅन 30 दिवसांचा असेल आणि जर महिना 31 दिवसांचा असेल तर प्लॅन 31 दिवस चालेल.
259 रुपयांच्या प्लॅन बद्दल बोलायचं झाल तर यामध्ये दररोज 1.5 GB डेटा मिळणार असून हा डेटा संपल्यानंतर 64Kbps चा स्पीड इंटरनेटला असेल. त्यामुळे Whatsapp वापरता येऊ शकतं.
तसेच, यामध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100SMS मिळणार असतील. याशिवाय जिओ अॅप्सचे फ्री सबस्क्रिप्शनही यासोबत दिलं जाणार आहे आणि त्याची वैधता एक महिन्याची असेल. प्रत्येक महिन्याच्या त्याच तारखेला ते रिनीव्ह केलं जाईल.
Jio च्या इतर प्रीपेड प्लॅन प्रमाणे, या 259 रुपयांच्या प्लानला देखील एकावेळी अनेक वेळा रिचार्ज केला जाऊ शकतात. अॅडव्हान्स रिचार्ज केल्यानंतर चालु प्लॅन संपल्यानंतर नवीन प्लॅन आपोआप अॅक्टीव्ह होतो. यामुळे प्रत्येक महिन्याच्या तारखा मोबाईल रिचार्जसाठी लक्षात ठेवायची गरज लागणार नाही.