मुंबई: टेलिकॉम कंपन्यांनी आपले सगळे प्लॅन वाढवले आहेत. तरीसुद्धा वोडाफोन आणि एअरटेलपेक्षा जिओ स्वस्तच आहे. जिओने आपल्या ग्राहकांचा विचार करून प्लॅनचे दर आटोक्यात ठेवले आहेत. आज जिओच्या अशा प्लॅनबद्दल जाणून घेणार आहोत जो तुमचं मन जिंकून घेईल. याचं कारण म्हणजे वर्क फ्रॉम होम आणि घरी राहणाऱ्यांसाठी आता या प्लॅनमध्ये खास एक OTT प्लॅटफॉर्मचं सब्स्क्रिप्शन मिळणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Reliance Jio ने आपला प्रीपेड प्लॅन पुन्हा नव्याने लाँच केला आहे. या प्लॅनमध्ये OTT सोबत खास सेवा मिळणार आहेत. 499 रुपयांच्या प्लॅनमध्ये अनेक गोष्टी मिळणार आहेत. या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा मिळेल आणि Disney + Hotstar देखील मोफत उपलब्ध असेल. याशिवाय 100 SMS आणि अनलिमिटेड कॉलिंगची सेवा मिळणार आहे. 


या प्लॅनमध्ये जर तुम्ही पूर्ण 2 GB डेटा वापरला असेल तर त्यानंतर 64 Kbps स्पीडनं पुढे डेटा सुरू राहणार आहे. प्रीपेड प्लान Disney+ Hotstar OTT प्लॅटफॉर्म सेवेचा लाभ घेता येणार आहे. याशिवाय Jio चे सर्व अॅप Jio Cinema, Jio TV तुम्हाला वापरता येणार आहे. 


याशिवाय जिओचा 601 रुपयांचा प्लॅन आहे. ज्यामध्ये तुम्हाला Disney+ Hotstar मिळणार आहे. याची वैधता 28 दिवस 100 SMS अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 3 GB डेटा मिळणार आहे. 799 आणि 1,066 या दोन्ही प्लॅनमध्ये Disney+ Hotstar सेवा मिळणार आहे.