मुंबई : ऱिलायन्स जिओ बाजारात आल्यानंतर ग्राहकांसाठी नवनवे ऑफर लाँच केल्या जातायत. गेल्या काही दिवसांपूर्वी यूजर्सला स्वस्त प्लान दिल्यानंतर कंपनीने आणखी एक शानदार सर्व्हिस सुरु केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवी सर्व्हिस गेल्या महिन्यात रिलायन्स जिओने गुपचूप लाँच केले होते. कंपनीने जिओटीव्ही(jio tv)लाईव्ह स्ट्रीमिंग सर्व्हिसचे वेब व्हर्जन लाँच केले. या सुविधेनंतर आता युजर्स आता वेब ब्राऊजरच्या मदतीने सर्व लाईव्ह टीव्ही शो पाहू शकतात. जिओ टीव्हीच्या वेब व्हर्जनची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून केली जात होती. 


फक्त जिओ यूजर्सला मिळणार फायदा


यूजर्सही मागणी पाहता जिओने जिओ टीव्हीचे वेब व्हर्जन लाँच केलेय. जर तुम्ही जिओ युजर्स आहात तर कोणत्याही ब्राऊजरने https://jiotv.com/  लॉग इन करा. जिओ टीव्हीच्या वेब व्हर्जनमध्ये युजर्सला जिओ टीव्ही अॅपमधील सर्व कंटेट आणि टीव्ही चॅनेल पाहता येतील. 


७ दिवस जुने प्रोगाम बघू शकणार


जिओ टीव्हीमध्ये एंटरनेटमेंट, सिनेमा, न्यूज आणि स्पोर्ट्सचे सर्व चॅनेल्लचा समावेश आहे. यात एचडी चॅनेलला फिल्टर करण्याचा ऑप्शनही आहे. तुम्ही जिओ टीव्हीच्या वेब व्हर्जनमध्ये आपली आवडती भाषा निवडू शकता. यातील कॅचअप फीचरच्या मदतीने तुम्ही सात दिवसांपूर्वीचेही प्रोग्राम पाहू शकता. 


मोठ्या स्क्रीनवरही चालणार वेब टीव्ही


वेब व्हर्जनला अॅक्सेस करण्यासाठी तुमच्याकडे जिओ मोबाईल नेटवर्क असणे गरजेचे आहे. जिओ सब्सक्रायबरला आपले आवडते चॅनेल्स मोठ्या स्क्रीन्सवर बघण्याचा पर्याय असेल.