मुंबई : जर तुम्ही जिओ युजर आहात किंवा जिओचे प्रशंसक आहात तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. येत्या काही दिवसांत, रिलायन्स जिओ स्वस्त अँड्राईड स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. सध्या रिलायन्स जिओचे सर्वात स्वस्त 4 जी हँडसेट प्रथमच बुक केलेल्यांसाठी वितरित करण्यात येत आहे. त्यानंतर मात्र या फोनचे प्रोडक्शन थांबवले असून नवीन अँड्राईड स्मार्टफोन आणण्याचा कंपनी विचार करते आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फॅक्टर डेलीच्या अहवालानुसार, जिओने ६० लाखांपर्यंत आधीचा फोन पोहोचवण्याचा निर्धार केला आहे. जिओने सध्या या फोनचं उत्पादन बंद केलं असलं तरी ते पुन्हा त्याचं उत्पादन सुरु करु शकतात. पण जिओ स्मार्ट अँड्राईड फोन आणण्याचा देखील विचार करत असल्याचं बोललं जातंय.  रिलायन्स जिओ आता नवीन प्रकारच्या अँड्रॉइड स्मार्टफोनवर काम करीत आहे. या फोनसाठी खास व्हर्जनचं अॅप देखील बनवण्याचा विचार आहे. 


जिओ अँड्राईडसाठी गुगलशी चर्चा करत आहे. जेणेकरुन स्वस्त 4 जी अँड्राईड स्मार्टफोन लॉन्च करता येईल. या अहवालात असेही म्हटले आहे की, कंपनीचा लक्ष्य अजूनही तेच आहे. आधीच्या फोनसाठी 60 लाख प्री-बुकिंग केले गेले आहे आणि आता कंपनी आता या ग्राहकांना हे फोन वितरित करीत आहे.