जिओने JioPhone Next लॉन्च करण्याची केली घोषणा, जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन ठरणार
रिलायन्स इंडस्ट्रीजने जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन `जिओफोन नेक्स्टची आपल्या 44 व्या वार्षिक बैठकीत घोषणा केली.
मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजने जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन 'जिओफोन नेक्स्टची आपल्या 44 व्या वार्षिक बैठकीत घोषणा केली. कंपनीचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी या फोनविषयी बोलकाना म्हणाले की, आताही देशातील 30 कोटी लोकं स्मार्टफोन वापरण्यास सक्षम नाहीत. अशा लोकांना स्मार्टफोन वापरता यावा म्हणून कंपनी JioPhone Next लॉन्च करेल.
यावर्षी 10 सप्टेंबरपासून गणेश चतुर्थच्या मुहूर्तावर जिओ फोन नेक्स्ट बाजारात येणार आहे. हा फोन गूगलच्या सहकार्याने रिलायन्सने तयार केला आहे. हा फोन अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टमवर चालेल. भारतीय बाजारपेठेसाठी खास तयार केलेल्या जियोफोन-नेक्स्ट स्मार्टफोनवर युजर्सला गुगल प्ले वरून अॅप्स डाउनलोड करता येणार आहे. स्मार्टफोनमध्ये उत्तम कॅमेरा आणि अँड्रॉइड अपडेटसुद्धा मिळतील. मुकेश अंबानी यांनी या फोनचे वर्णन, केवळ भारतातच नव्हे तर जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन म्हणून केले.
गेल्या वर्षी रिलायन्स जिओने गुगलबरोबर भागीदारीची घोषणा केली होती. गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई नवीन स्मार्टफोनविषयी म्हणाले, “आमची पुढची पायरी गुगल आणि जिओच्या सहकार्याने नवीन, परवडणार्या जिओ स्मार्टफोनपासून सुरू होते. जी भारतासाठी बनविलेले आहे. यामुळे लाखो नवीन युजर्ससाठी नवीन शक्यता उघडतील जे प्रथमच इंटरनेटचा अनुभव घेतील. गूगल क्लाऊड आणि जिओ यांच्यात नवीन 5 जी भागीदारी अब्जाहून अधिक भारतीयांना वेगवान इंटरनेटशी जोडण्यास आणि भारताच्या पुढच्या टप्प्यातील डिजिटायझेशनची पायाभरणी करण्यास मदत करेल."
अध्यक्ष मुकेश अंबानी म्हणाले, “आम्ही जागतिक भागीदारांसह 5 जी इकोसिस्टम विकसित करण्यासाठी आणि 5 जी उपकरणांची श्रेणी विकसित करण्यासाठी काम करत आहोत. जिओ केवळ भारत 2G विनामूल्य करण्यासाठीच नव्हे तर 5 जी सक्षम करण्याकरिता कार्य करीत आहे.
रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी म्हणाले की, डेटा वापरण्याच्या बाबतीत रिलायन्स जिओ जगातील दुसरे नेटवर्क बनले आहे. रिलायन्स जिओच्या नेटवर्कवर दरमहा 6300 दशलक्ष जीबी डेटा वापरला जातो. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण 45 टक्के जास्त आहे.
जिओफोन-नेक्स्टच्या किंमती जाहीर केल्या नसल्या तरी तज्ञांचा असा विश्वास आहे की, त्याची किंमत खूपच कमी ठेवली जाईल. जिओ-गूगलचा अँड्रॉइड-आधारित स्मार्टफोन जिओफोन-नेक्स्ट गेम चेंजर असल्याचे सिद्ध होईल. हे 30 कोटी लोकांचे जीवन बदलू शकते ज्यांच्या हातात अद्याप 2G मोबाइल सेट आहेत. स्पीड, चांगली ऑपरेटिंग सिस्टम आणि परवडणार्या किंमतीच्या आधारे जिओ-गुगलचा नवीन स्मार्टफोन कोट्यावधी नवीन ग्राहकांना जोडेल.