मुंबई : गणेश चतुर्थीला १० सप्टेंबर रोजी जिओचा सर्वात स्वस्त फोन JioPhone Next लॉन्च होणार आहे. यात गुगलचा देखील मोठा सहभाग आहे. या फोनचं नाव JioPhone Next असं आहे, हा जगातील सर्वात स्वस्त ४ जी फोन ठरण्याची शक्यता आहे. या फोनची किंमत ३ ते साडेतीन हजार रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे . 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या फोनमध्ये गुगल अॅपस्टोअर देखील असणार आहे, या फोनची अनेक दिवसापासून चर्चा आहे, तर 13 मेगापिक्सलचा कॅमेरा, तर 8 मेगापिक्सल फ्रंन्ट कॅमेरा देखील या फोनला आहे. असा दावा देखील केला जात आहे की,  JioPhone Next  हा Android 11 (Go Edition) ला देखील सपोर्ट करेल.


रिलायन्सने या फोनची नेमकी किंमत काय असेल हे अजून स्पष्ट केलेलं नसलं तरी, ३ हजाराच्या आसपास या फोनची किंमत असू शकते असा अंदाज लावला जात आहे.


यात गुगल असिस्टेंट, टेक्स्ट-टू-स्पीच क्षमता, भाषांतर, एअर फिल्टरवाला स्मार्टकॅमेरा, आणि आणखी काही फीचर्स आहेत,कॅमेरा अॅपला गुगल आणि जिओ यांनी मिळून बनवलं आहे, हा नाईटमोड, एचडीआर एन्हांसमेंट आणि स्नॅपचॅट एआर फिल्टरसारख्या सुविधांसह येईल.