नवी दिल्‍ली : व्हॅलेंटाईनच्या तोंडावर रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांना एक खास गिफ्ट दिलंय. या गिफ्टमुळे जिओ फोन घेतलेल्या ग्राहकांना चांगलाच फायदा होणार आहे. 


काय दिलं गिफ्ट?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जिओ फोनचे ग्राहक आता आपल्या ४जी फीचर फोनमध्ये सोशल मीडिया अ‍ॅप फेसबुकचा वापर करू शकतील. रिलायन्स जिओने मंगळवारी माहिती दिली की, त्यांचे ग्राहक बुधवार म्हणजेच व्हॅलेंटाईन डे पासून जिओ अ‍ॅपस्टोरवरून फेसबुक अ‍ॅप डाऊनलोड करू शकतील. फेसबुक अ‍ॅपचं हे खास व्हर्जन जिओच्या ओएससाठी तयार करण्यात आलंय. यात पुश-नोटिफिकेशन, व्हिडिओ आणि एक्टर्नल कंटेट लिंक असे काही फीचर्स असतील. 


फेसबुक केवळ सुरूवात....


जिओकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, यामुळे जिओ फोनचे ग्राहक आता फेसबुक वापरू शकतील जे जिओ फोनचा वापर करत आहेत. जिओचे मुख्य आकाश अंबानी म्हणाले की, फेसबुक तर केवळ सुरूवात आहे. जिओफोन जगातले चांगले मोबाईल अ‍ॅप एकाच जागी आणतील. हे जिओ फोन ग्राहकांना माझं आश्वासन आहे. 


फेसबुकचे उपाध्यक्ष फ्रांसिस्को वरेला म्हणाले की, जिओसोबत भागीदारी करून आम्ही आनंदी आहोत. जिओ फोनच्या माध्यमातून फेसबुकचा वापर करण्याची ही मोठी संधी आहे.