नवी दिल्ली : तुम्ही रिलायन्स जिओ युजर्स आहात? तर मग ही बातमी तुमच्यासाठी खूपच महत्वाची आणि आनंदाची आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीलंकेत सुरु असलेल्या ट्रायसीरिज दरम्यान जिओ युजर्स आणि क्रिकेटप्रेमींना एक खुशखबर मिळाली आहे. आता जिओचं मोबाईल टीव्ही अॅप 'जिओ टीव्ही' ने घोषणा केलीय की, त्यांचे युजर्स निडास ट्रॉफीचा आनंद आपल्याला वाटेल त्यावेळी घेऊ शकतात.


कंपनीतर्फे सांगण्यात आलयं की, ३ देशांच्या क्रिकेट सीरिज दरम्यान युजर्सला मैदानातील कुठल्या अँगलने मॅच पहायची आहे, कुठल्या कॅमेऱ्याने पहायची आहे तसेच कुठल्या भाषेत कमेंट्री ऐकायची आहे याची निवड करु शकतात.


प्रेक्षकांना मिळणार चांगला अनुभव


रिलायन्स इंडस्ट्रिजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांचा थोरला चिरंजीव आकाश अंबानीने सांगितले की, खेळ प्रतिस्पर्धां पाहताना व्यक्तिगत उपक्रम बदलले जातील. यासोबतच सध्याच्या स्थितीत असलेल्या प्रेक्षकांत वाढ करण्यासाठी आम्ही त्यांच्या भाषेत अनुवाद करुन देत आहोत. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने प्रत्येक क्षेत्रातील ग्राहकांचा अनुभव उत्कृष्ट रहावा यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत.


आपल्या इच्छेने पाहू शकाल प्रत्येक अँगलने मॅच


जिओ युजर्सला कंपनीतर्फे देण्यात येणाऱ्या सुविधेच्या माध्यमातून आपल्या मर्जीनुसार प्रत्येक अँगलने मॅच पाहू शकतो. जिओ टीव्हीच्या माध्यमातून क्रिडाप्रेमी निडास ट्रॉफीचा आनंद लुटू शकतात. युजर्स पाच वेगवेगळ्या कॅमेरा अँगलने मॅचचा आनंद लुटू शकतात.


आपल्या भाषेत ऐका मॅचची कॉमेंट्री


क्रिकेटप्रेमी स्टम्प, माईक आणि स्टेडिअममधील माहौलच्या ऑडिओचा अनुभवही घेऊ शकतात. आपली आवडती भाषा हिंदी, इंग्रजी, तामिळ, तेलुगू आणि कन्नडमध्ये क्रिकेटची कॉमेंट्री ऐकू शकता. जहीर खान, आशीष नेहरा आणि गौरव कपूर सारख्या विश्लेषकांकडून विश्लेषण तसेच कमेंट्री ऐकू शकतात.