मुंबई: सध्या अनेक अॅप धोकादायक आहे. मोबाईल जेवढा वापरायला चांगला वाटतो तेवढाच तुमचा डेटा चोरतात इतकच नाही तर त्याचा चुकीचा वापर करतात. तुमच्या फोनमध्ये तुम्ही हे 10 अॅप जर डाऊनलोड केले असतील किंवा वापरत असाल तर आजच डिलीट करा. नाहीतर तुमच्या फोनमधील सर्व डेटा हॅक होऊ शकतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गूगल प्ले स्टोअरमध्ये अशी काही एन्ड्रॉइड अ‍ॅप्स आहेत जी तुमची माहिती लीक करू शकतात किंवा त्याचा गैरवापर करू शकतात. हे एप्स आपली आर्थिक माहिती चोरू शकतात. याद्वारे आपल्यासह बँकांची फसवणूक देखील होऊ शकते. म्हणून सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. हे 10 अॅप्स शक्य तेवढ्या लवकर आपल्या मोबाईलमधून काढूण टाकणं फायद्याचं ठरणार आहे. 


जोकर मालवेअर आपल्या डेटावर कब्जा मिळवतो. जोकर मालवेअर मोबाईलमध्ये जासूसी करतो. मोबाईलमधील माहिती चोरणे आणि SMS वर लक्ष ठेवण्यासाठी खास हा मालवेअर डिझाइन करण्यात आला आहे. त्याद्वारे तुमचे अकाऊंट हॅक करणं सहज सोपं होतं. त्यामुळे युझर्सनी सतर्क राहाणं आवश्यक आहे. 


हे अॅप अॅन्ड्रॉइडच्या अलर्ट सिस्टिमचा दुरउपयोगही करू शकतो. दीड महिन्यात 50 हून अधिक अॅपमध्ये जोकर आढळल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे कोणतंही सॉफ्टवेअर किंवा अॅप डाऊनलोड करताना युझर्सनं काळजी घेणं गरजेचं आहे. तसंच आपली माहिती कोणत्याही चॅटवर कोणालाही देऊ नका. ज्याचा दुरुपयोग होऊ शकतो.


तुमच्या फोनमधील हे अॅप तातडीनं हटवा


Translate Free
-PDF Converter Scanner
-Delux Keyboard
-Saying Message
-Free Affluent Message
-Comply QR Scanner
-Font Style Keyboard
-Private Message
-Read Scanner
-Print Scanner