मुंबई : रिपब्लिक डे आणि लॉन्ग विकेंडचं औचित्य साधून अनेक ई कॉमर्स साईटवर सेल सुरु झाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फ्लिपकार्ट, अमेझॉनवर अनेक बंपर सेल सुरू झाले आहेत. अनेक महागड्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर घसघशीत सूट मिळणार आहे. या ऑफरअम्ध्ये कार्बन मोबाईलच्या टाईटेनियम सीरीजमधील स्मार्टफोनवरही या जंबो सेलमध्ये सूट देण्यात आली आहे. या सेलमध्ये या फोनवर 4491 रूपयांची सूट देण्यात आली आहे.  


कार्बन आणि एअरटेलमध्ये टायअप 


फ्लिपकार्टवर 21 ते 23 जानेवारीदरम्यान सेल सुरू आहे. 13 MP रिअर आणि  8 MP सेल्फी कॅमर्‍याच्या या फोनमध्ये 4000 mAh ची बॅटरी आहे. या फोनची किंमत 7490रूपये आहे. मात्र फ्लिपकार्टवर हा फोन  2999 रूपयांमध्ये उपलब्ध होणार आहे. Karbonn Titanium Jumbo फोन ऑक्टोबर 2017 मध्ये रिलीज करण्यात आला. कंपनीने हा फोन रिलीज केला तेव्हा त्याची किंमत 6490 होती. 


खास ऑफर 


कार्बनचा हा फोन सेलमध्ये 4999 रूपयांमध्ये उपलब्ध होता. मात्र आता यावर कॅशबॅकची ऑफर देण्यात आली आहे. याकरिता एअरटेलच्या सीमकार्डाची गरज आहे. 18 महिन्यात ग्राहकाने किमान 3500 रूपयांचा रिचार्ज करणं आवश्यक आहे. 18 महिन्यांनंतर ग्राहकांना 500 रूपयांचा कॅशबॅक मिळणार आहे. यानंतर पुन्हा 18 महिन्यात 3500चा रिचार्ज करावा लागेल. तेव्हा 1500 रूपयांचा कॅशबॅक मिळणार आहे. एकूण ग्राहकांना 2000 रूपयांचा कॅशबॅक मिळणार आहे. कॅशबॅकची रक्कम एअरटेल पेमेंट बॅंक अकाऊंटमध्ये मिळणार आहे.