कावासाकी `निंजा 650` नव्या रंगात लाँच, पाहा किंमत आणि फिचर्स
स्पोर्ट्स बाईक चालवण्याची तुम्हाला आवड असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण, दुचाकी निर्माता कंपनी कावासाकीने भारतीय बाजारात आपली निंजा 650 बाईकचे नवे एडिशन लाँच केले आहे.
नवी दिल्ली : स्पोर्ट्स बाईक चालवण्याची तुम्हाला आवड असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण, दुचाकी निर्माता कंपनी कावासाकीने भारतीय बाजारात आपली निंजा 650 बाईकचे नवे एडिशन लाँच केले आहे.
नवी बाईक नव्या रंगात
कावासाकी इंडियाने निंजा 650 बाईक नव्या रंगात लॉन्च केली आहे. नवी बाईक कॅंडी प्लाज्मा ब्लू रंगात मिळणार आहे. एबीएस फिचर असलेल्या या नव्या बाईकची दिल्लीतील एक्स शो रुम किंमत 5.3 लाख रुपये आहे.
दोन्ही बाईक्स बाजारात उपलब्ध
निंजा 650 या बाईकला देण्यात आलेला नवा ब्लू रंग आधिच्या काळ्या रंगाला रिप्लेस करणार आहे. निंजा 650चं केआरटी एडिशन मॉडेल 2017 मध्ये लॉन्च करण्यात आलं होतं. नव्या रंगात निंजा 650 उपलब्ध होत असली तरी जुनी निंजा 650 केआरटी एडिशनही बाजारात उपलब्ध असणार आहे. या बाईकची किंमत 5.49 लाख रुपये आहे.
बाईकचे फिचर्स...
तसं पाहिलं तर बाईकमध्ये टेक्निकली काहीही बदल करण्यात आलेला नाहीये. बाईकमध्ये आता ही 649cc चं लिक्विड कूल्ड, पॅरेलल ट्विन इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन 8,000 Rpm वर 65.7 न्यूटन मीटर (Nm) टॉर्क जनरेट करतं. या बाईकला 6 स्पीड गियरबॉक्स देण्यात आलं आहे. यामध्ये ड्युअल पोर्ट फ्युअल इंजेक्शन सिस्टम देण्यात आलं आहे.
बाईकचं वजन आणि फ्युअल टँक
बाईकचं वजन 193kg असून ही सध्याच्या मॉडलच्या तुलनेत 18kg हलकी आहे. बाईकमध्ये 15 लीटरचं फ्युअल टँक देण्यात आली आहे.
बाईकला स्टायलिश अलॉय व्हिल्ज देण्यात आले आहेत. ब्रेकिंग सिस्टमसाठी ड्युअल फ्रंट आणि सिंगल रियर पेटल डिस्क ब्रेक्स देण्यात आले आहेत.