किंमत जाहीर होण्याआधीच Kia च्या SUV चा धुमाकूळ, 24 तासांत 13 हजारांपेक्षा जास्त बुकिंग
Kia Seltos सह कंपनीने जवळपास 4 वर्षांपूर्वी भारतीय बाजारपेठेत प्रवेश केला होता. आता कंपनीने याच्या फेसलिफ्ट मॉडेलमध्ये अनेक बदल करत बाजारात आणलं आहे. हे बदल या कारला मागील मॉडेलच्या तुलनेत अजून दर्जेदार बनवत आहेत.
भारतीयांमध्ये स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल (SUV) कारची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. नुकतंच दक्षिण कोरियन कार निर्माता कंपनी Kia ने भारतीय मार्केटमध्ये आपलं प्रसिद्ध मॉडेल Kia Seltos ला नव्या फेसलिफ्ट मॉडेलसह सादर केलं होतं. कंपनीने अद्याप कारची किंमतही जाहीर केलेली नसली, तरी 14 जुलैपासून अधिकृत बेवसबाईटवर बुकिंग सुरु केलं आहे. कंपनीच्या डिलरशिप आणि वेबसाईटच्या माध्यमातून माध्यमातून 25 हजारांचं टोकन देत कार बूक केली जाऊ शकते. आता कंपनीने जाहीर केलं आहे की, फक्त 24 तासात या एसयुव्हीच्या 13 हजार 400 युनिट्सची बुकिंग झाली आहे.
मध्यम आकाराच्या एसयुव्हीमध्ये कोणत्याही मॉडेलला मिळालेली ही सर्वाधिक बुकिंग आहे. कंपनीच्या माहितीनुसार, 1973 युनिट्सची बुकिंग K-Code प्रोग्रामअंतर्गत करण्यात आली आहे. Kia ने 'K-Code' च्या माध्यमातून हाय प्रायोरिटी बुकिंगची घोषणा केली होती. यामध्ये ग्राहकांना कमीत कमीत कमी वेळात एसयुव्हीची डिलिव्हरी दिली जाणार आहे. के-कोडला सध्याच्या Seltos मालकांकडून किया इंडिया बेबसाइट आणि मायकिया अॅपवरुन जनरेट करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. जेणेकरुन ते Seltos ला अपग्रेड करु शकतात.
कशी आहे Kia Seltos -
Kia ने सेल्टॉससह 2019 मध्ये भारतीय बाजारपेठेत प्रवेश केला होता. आता त्याच्या फेसलिफ्ट मॉडेलला मार्केटमध्ये आणण्यात आलं आहे. नव्या सेल्टॉसमध्ये कंपनीने अनेक बदल केले आहेत, ज्यामुळे ती जुन्या मॉडेलच्या तुलनेत अधिक दर्जेदार ठरत आहे. या एसयुव्हीत 1.5 लीटर क्षमतेचं नवं पॉवरफूल T-GDi पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन 160ps ची पॉवर आणि 253 Nm चा टॉर्क जनरेट करतं.
नव्या सेल्टॉसच्या फ्रंटला नव्या डिझाइनचं ग्रिल, नवे हेडलँप, LED चे टाइम रनिंग लाइट्स, नवे टेल लँप, पॅनोरमिक सनरुफ या सुविधा मिळतात. नवा प्युअर ऑलिव्ह रंगाचा पर्याय नव्या सेल्टॉसला अत्यंत सुंदर आणि आकर्षक बनवतो. नव्या किया सेल्टॉसचा नव्याने डिझाइन करण्यात आलेला बंपर, नवी स्किड प्लेट आणि स्पोर्ट लुकिंग सिग्नेचर टाइगर नोज ग्रील त्याला आकर्षक लूक देत आहे.
याच्या मागील भागातील LED कनेक्टेड टेललँप्स खास लूक देतात. नव्या सेल्टोसला 8 मोनोटोन, 2 ड्युअल टोन आणि एक्स्क्लुझिव्ह मॅट ग्रेफाइट रंगात सादर करण्यात आलं आहे. यामध्ये नव्याने लाँच करण्यात आलेला प्युअर ऑलिव्ह रंगही आहे.
नव्या सेल्टोस फेसलिफ्टमध्ये 26.4 सेमीचा पूर्पपणे डिजिटल क्लस्टरसह ड्युअल स्क्रीन पॅनोरमिक डिस्प्ले, 26.03 सेमी एचडी टचस्क्रीन नेव्हिगेशन, ड्युअल झोन फुली ऑटोमॅटिक एअर कंडिशनर आणि 18 इंचाचं सेमी क्रिस्टल कट ग्लॉसी ब्लॅक अलॉय व्हिल्स मिळतात. याशिवाय कंपनीने कारमध्ये ड्युअल पॅन पमॅनोरमिक सनरुफ आणि इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेकला स्थान दिलं आहे.
15 स्टँडर्ड सेफ्टी फिचर्स
या एसयुव्हीमध्ये सुरक्षेची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे. कारमध्ये सुरक्षेचे 15 फिचर्स असून, हायर व्हेरियंटमध्ये 17 अॅडव्हान्स सेफ्टी फिचर्स आहेत. स्टँडर्ड फीचर्स म्हणून SUV मध्ये 6 एअरबॅग आणि 3 पॉइंट सीट बेल्ट, ABS (एंटी-लॉक ब्रेक सिस्टम), BAS (ब्रेक फोर्स असिस्ट सिस्टम), ऑल व्हील डिस्क ब्रेक, ESC (इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल), आणि VSM (व्हीकल स्टेबिलिटी मैनेजमेंट) यांचा समावेश आहे.