मुंबई : एअर कंडिशनर (एसी) असणं ही आता सर्वसाधारण बाब झालीय. अनेकांच्या घरात किंवा ऑफिसमध्ये एसी असतोच. एसी सुरू असताना त्यातून पाणी गळण्याचे प्रकार अनेकदा आपल्यासमोर घडतात. पण असं का होतं याबद्दल माहितेय का ? चला याबद्दल थोड समजून घेऊया...वातावरण थंड ठेवणं हे एसीचं मुख्य कार्य असतं. यासोबतच खोलीतील वातावरण समप्रमाणात राखण्यासही एसीची मदत होत असते. यामुळे वातावरण आरामदायक बनते.


बाष्पाचं पाणी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अगदी सोपं उदाहरण द्यायच तर ग्लासात ठेवलेलं थंड पाणी आपण पाहिलंय. थंड पाणी भरलेल्या ग्लासाच्या बाहेर बाष्प जमा होत आणि थोड्यावेळाने ग्लासाच्या खाली पाणी साचलेलं आपण पाहतो. तसच काहीस एसीबद्दलही सांगता येईल. एसी सुरू असताना त्यात असलेल्या पाईपमधून गॅस प्रवाह सुरू असतो. या पाइपवर पाण्याचे थेंब जमा होतात. हे थेंब बाहेरच्या गरम वातावरणाच्या संपर्तात आल्यावर पाण्यामध्ये रुपांतरीत होतात. हे पाणी एसीमधून बाहेर पडताना आपल्याला दिसते. 
एअर कंडिशनरच्या आता दोन कॉईल्स सेट असतात. जे कंडेनसरशी जोडले गेलेले असतात. एक कॉईल गरम तर दुसरा थंड ठेवला जातो. कॉईल्सच्या आत रसायनांमध्ये वारंवार बाष्पीभवन आणि घुलनशील प्रक्रीया होत असते. ही प्रक्रीया कॉईल्स थंड ठेवण्यास मदत करते. यामुळे एसीतून निघणारी हवा थंड असते.


पाण्याच्या कॉईल्सवर बर्फ 


हवेचा कॉइल्सशी संबध येतो तेव्हा थंड कॉईल्स हवेतील गरमी खेचून घेत पाणी येत. यातील काही पाण्याचे पुन्हा बाष्प होते आणि कॉइल्स थंड ठेवण्यास मदत होते. जर एसीतून पाणी येतय तर तो चांगल्या प्रकारे कार्यान्वित होतोय अस मानलं जातं. जर पाणी येत नसेल तर पाण्याच्या कॉईल्सवर बर्फ जमा झाल्याचे निदान होऊ शकते. एसीच्या इतर भागातून पाणी बाहेर येत असेल तर तो योग्य काम करत नसल्याचे समजावे.