नवी दिल्ली : देशातील प्रसिद्ध कार निर्माता कंपनी टाटा मोटर्सने नवी प्रमियम हॅचबॅक कार टाटा अल्ट्रोजच्या (Tata Altroz) ग्लोबल NCAP ची टेस्ट केली आहे. टाटाची ही नवी कार आता यशस्वी होण्यासाठी बाजारात उतरत आहे. या कारला किती स्टार्स मिळाले ?, हिचा परफॉर्मन्स कसा आहे ?, ही कार कशी आहे ? त्याचे फिचर्स काय आहेत ? याबद्दल जाणून घेऊया..


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टाटा अल्टोच्या या टेस्ट सेफ्टीला पाच पैकी पाच स्टार्स मिळाले आहेत. एडल्ट सेफ्टीसाठी १७ मध्ये १६.१३ पॉईंट मिळाले आहेत. चाईल्ड प्रोटेक्शनच्या बाबतीत या कारला ३ स्टार्स तर ४९ पैकी २९ पॉईंट्स मिळाले आहेत. या कारला लॉन्च होण्याआधीच ग्लोबल Global NCAP क्रॅश टेस्टमध्येही स्टार मिळाले आहेत. 


इंजिन आणि पॉवरच्या बाबतीत टाटा अल्ट्रोज एक पेट्रोल आणि डिझेल इंजिनच्या पर्यायात मोडते. यामध्ये आधी १.२ लीटरचे BS-6 पेट्रोल इंजिन दिले गेले होते. जे की ८६ Ps ची पॉवर आणि ११३ Nm ची टॉर्क निर्माण करत होते. तर दुसरीकडे १.५ लीटरचे BS-6 डिझेल इंजिन दिले गेले आहे. जे की 90 PS ची पॉवर आणि २०० Nm ची टॉर्क निर्माण करते.  



सेफ्टी फिचर्स


सेफ्टी फिचर्स Tata Altoz च्या टाटा मोटर्स लेटेस्ट अल्फा प्लॅटफॉर्मवर बनवला आहे. या कारमध्ये ड्यूअल एअरबॅग्स, एंटी लॉक ब्रेक्रिंग सिस्टिम, रियर पार्किंग सेंसर, रेन सेंसिग वायपर आणि ईबीडी, क्रूझ कंट्रोल सारखे फिचर्स देण्यात आले आहेत. 


दिल्लीमध्ये या कारची किंमत ५.५ लाख रुपयांपासून सुरु होऊन ८.५ लाखापर्यंत आहे.