मुंबई : आपला देश विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे. अशा परिस्थितीत भारतात अनेक बांधकाम केले जातात. ज्यात अनेक बिल्डींग, रस्ते आणि ब्रीजचा समावेश आहे. दोन ठिकाणांना जोडण्यासाठी किंवा वाहतूकीमधील वेळ वाचवण्यासाठी अनेक ठिकाणी सागरी ब्रीज बांधल्याचे तुम्ही पाहिले असाल. परंतु हे ब्रीज पाहाताना आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनात प्रश्न निर्माण होत असतो की, हा ब्रीज नक्की बांधतात कसा? कारण आपण बऱ्याच दा पाहातो की, समुद्रात आणि नदीत नेहमीच पाण्याचा प्रवाहा होत असतो, मग हे कसं शक्य आहे? ब्रीज बांधण्यासाठी नक्की मग कोणती पद्धत वापरली जाते? असे प्रश्न तुमच्याही मनात पडले असतील. तर नदीच्या किंवा समुद्राच्या मध्यभागी हा ब्रीज कसा बांधला जातो, त्याचे उत्तर आज आम्ही तुम्हाला देणार आहोत….


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे ब्रीज वेगवेगळ्या प्रकारचे असतात. बीम ब्रीज, सस्पेंशन ब्रीज, कमान ब्रीज असे प्रकार तुम्ही पाहिले असाल. यामध्ये पिलर ब्रीज करण्यासाठी सर्वप्रथम पाण्याचे खोलीकरण, पाण्याच्या प्रवाहाची गती, पाण्याखालील मातीची गुणवत्ता, ब्रीज बनवताना त्यावर पडलेला भार आणि ब्रीज तयार झाल्यानंतर गाड्यांचा भार यावर सखोल संशोधन केले जाते. या संशोधनानंतरच ब्रीज बांधण्याचे काम सुरू केले जाते.


फाउंडेशन अशा प्रकारे करतात


ब्रीजमध्ये फाउंडेशन बनवला जातो आणि संपूर्ण संशोधनाच्या आधारे फाउंडेशनची पहिली योजना बनवली जाते. कारण तोच या ब्रीजचा महत्वपूर्ण भाग आहे. तसे, पाण्याच्या मध्यभागी घातलेल्या पायाला कॉफरडॅम (Cofferdam) म्हणतात. हे कॉफरडॅम एका प्रकारच्या ड्रमसारखे असतात, जे क्रेनच्या मदतीने पाण्याच्या मध्यभागी ठेवले जातात. हा कॉफरडॅम स्टीलच्या मोठ्या प्लेटने बनवला जातो. हा कॉफरडॅम आकाराने गोल किंवा चौरस असू शकतो आणि तो ब्रीज बांधकाम, नदी इत्यादीं गोष्टींवर अवलंबून असतो.


सोप्या भाषेत सांगायचे तर, ते ड्रमसारखे आहे. तुम्ही जत्रेमध्ये मौत का कुआं (मृत्यूची विहीर) पाहिले असाल, कॉफरडॅम त्याच्या सारखेच असते. जे खूप मजबूत आणि स्टीलने बनलेले असते. याला पाण्याच्या मध्यभागी ठेवले जाते, ज्यामुळे पाणी याच्या बाहेर असते परंतु याच्या आत येत नाही. पाणी नसल्याने कॉफरडॅममध्ये, खाली माती दिसू लागते. त्यानंतर तेथे खांब बनवण्याचे काम सुरू केले जाते. इंजिनीअर याचा संपूर्ण अभ्यास करतात आणि एक मजबूत आधारस्तंभ बनवतात. खांब बांधल्यानंतर ब्रीजचे काम सुरू होते.


परंतु जर पाणी खोल असेल तर, कॉफरडॅम वापरून ब्रीज बांधता येत नाही. यासाठी जमिनीखाली खाली प्रथम संशोधन केले जाते, जेथे माती चांगली आहे आणि खांब तयार करण्यासाठी जेथील जमीन योग्य आहे. तेथे खड्डे तयार केले जातात आणि त्यामध्ये पाईप्स टाकले जाते आणि त्यातून पाणी बाहेर काढले जाते. मग या पाईपमध्ये सिमेंट आणि बाकी वस्तू भरल्या जातात. अशा अनेक पाईप्स एकत्र करुन त्याचा पिलर बनवला जातो.


ब्रीज कसा बनवला जातो?


ब्रीज बांधताना, अर्ध्याहून अधिक काम दुसर्‍या साईटवर केले जाते, जिथे ब्रीजचे ब्लॉक बनवले जातात. हे ब्लॉक दोन्ही खांबां दरम्यान लावून ब्रीज बनवला जातो. तसे, बरेच पिलर-ब्रीजही बांधले गेले आहेत, जे बांधण्याची पद्धत वेगळी आहे.