AC असो वा TV… इलेक्ट्रॉनिकवरील स्टार रेटिंग योग्य आहे की, नाही हे कसे शोधायचे?
आपण फ्रीझ, एसी किंवा टीव्ही खरेदी करत असतो तेव्हा त्याचे स्टार रेटिंग्स नक्की तपासतो.
मुंबई : आपण जेव्हाही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करायला जातो, तेव्हा त्या वस्तूचे वैशिष्ट्ये आणि किंमतीशिवाय आपण निश्चितपणे एक गोष्ट पाहातो. एवढेच नाही तर, आपण या गोष्टीला आपल्या खरेदीचा एक महत्त्वाचा भाग मानतो. ते म्हणजे या वस्तूंचे स्टार रेटिंग्स. आपण फ्रीझ, एसी किंवा टीव्ही खरेदी करत असतो तेव्हा त्याचे स्टार रेटिंग्स नक्की तपासतो आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू विकत घेताना आपण ते नक्कीच पाहिले पाहिजे, कारण त्याचा परिणाम थेट आपल्या महिन्याच्या बजेटवर पडतो.
खरेतर स्टार रेटिंगवरून तुम्ही अंदाज लावू शकता की, या वस्तुमार्फत किती वीज वापरली जाईल. परंतु हे देखील लक्षात घेण्यासारखे आहे की, ज्या वस्तूंचे सर्वात जास्त स्टार रेटिंग असते, त्या वस्तू थोड्या महाग असतात. कारण त्यामुळे तुमचे वीज बिल कपात केले जाते.
उदाहरणार्थ, 5 स्टार रेटिंगसह येणाऱ्या उत्पादनाचा अर्थ असा आहे की, तो कमी वीज वापरेल. परंतु, आजकाल अशी काही प्रकरणे समोर येत आहेत, ज्यामध्ये असे दिसून आले आहे की, काही उपकरणांचे रेटिंग हे चुकीचे आहे.
अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, हे रेटिंग कोण निश्चित करते आणि हे रेटिंग खरे आहे की, बनावट हे कसे ओळखायचे?
कोण हे रेटिंग देते?
हे रेटिंग ब्यूरो ऑफ एनर्जी एफिसिएंसीने दिले आहे. जर आपण या स्टिकरवर पाहिले, तर त्यामध्ये विजेच्या वापराविषयी माहिती दिलेली असते. तसेच, त्यावर एक वर्ष देखील लिहिलेले असते, ज्याला आपल्याला लेटेस्ट वर्षाच्या आधारे खरेदी केले पाहिजे. वास्तविक, विजेच्या वापराचे रेटिंग दरवर्षीनुसार बदलते.
खरे किंवा बनावट कसे जाणून घ्यावे?
आपण कोणतीही इलेक्टोनीक वस्तू घेणार असाल, तर प्रथम आपण हे रेटिंग तपासा. हे तपासण्यासाठी सर्व प्रथम BEE चा अधिकृत अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. तुम्ही हा अॅप सुरू करताच, तुम्हाला दिसेल की, त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या उत्पादनाची एक श्रेणी असेल, ज्यामध्ये एसी, फ्रिज, फॅन इत्यादींचा समावेश असेल.
यामध्ये तुम्ही विकत घेणार असलेल्या वस्तूची निवड करा आणि त्यामध्ये सर्व कंपन्यांचे रेटिंग दर्शविले जाईल. यानंतर, आपण घेणार असलेल्या वस्तूंचा शोधा घ्या आणि त्याचे रेटिंग्स पाहा. त्यामध्ये ती वस्तू बीईईमध्ये नोंदणीकृत आहे की, नाही ते पाहा आणि मगच ती विकत जा.