मुंबई :  व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) या सोशल मीडिया (Social Media) मेसेजिंग अ‍ॅपचा वापर हा फक्त चॅटसाठी (Chating) केला जात नाही.  पैसे ट्रान्सफर, फाईल शेअर, व्हीडिओ आणि व्हॉइस कॉलिंगसाठीही व्हॉट्सअ‍ॅप वापरलं जातं. व्हॉट्सअ‍ॅप चॅटबोटही महत्त्वाचं कम्युनिकेशन टूल ठरलंय. याद्वारे तुम्ही अनेक महत्त्वाचे कागदपत्र व्हॉट्सअ‍ॅपवर डाऊनलोड करु शकता. (know how to download important documents on whatsapp)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

MyGov चॅटबोट वापरुन  डीजीलॉकरमधून (Digilocker) आवश्यक ते डॉक्यूमेंट्स डाऊनलोड करु शकता. व्हॉट्सअ‍ॅपवरुन ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License), पॅन कार्ड (Pan Card) आणि इतर महत्त्वाचे डॉक्युमेंट्स डाऊनलोड करता येतात. मात्र यासाठी एक अट आहे. ती म्हणजे तुमचे सर्व कागदपत्र हे डीजीलॉकरमध्ये (DigiLocker) सेव असायला हवेत.


या मोबाईल नंबरवर मेसेज करा


सर्वात आधी तुम्हाला 9013151515 हा मोबाईल नंबर My Gov या नावाने सेव्ह करा. त्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप ओपन करुन  न्यू चॅट (New Chat) या पर्यायावर जा. इथे तुम्हाला My Gov सह चॅट विंडो ओपन करायचंय. 


चॅट सुरु केल्यानंतर अनेक ऑपशन्स मिळतील. मग गरजेनुसार हवे ते डॉक्युमेंट्स डाऊनलोड करु शकता. 


व्हॉट्सअ‍ॅपवर पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, व्हीकल रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (RC), इंश्यूरंस पॉलिसी डॉक्युमेंट, कोव्हीड सर्टिफिकेट, CBSE Class X मार्कशीट-पासिंग सर्टिफिकेट आणि  CBSE Class XII मार्कशीट डाऊनलोड करु शकता.