Maruti Suzuki Alto All Variants: मारुति सुझुकी अल्टो एकूण पाच प्रकारांमध्ये येते. ALTO STD (O), ALTO LXI(O)s, ALTO VXI, ALTO VXI+ आणि ALTO LXI (O) CNG या प्रकारात येते. यात 796 cc F8D, 3 सिलेंडर इंजिन आहे, जे पेट्रोलवर वेगळी आणि सीएनजीवर वेगळी पॉवर जनरेट करते. पेट्रोलवर ते 35.3 kW @ 6000 rpm ची उर्जा निर्माण करू शकते तर सीएनजीवर ते फक्त 30.1 kW @ 6000 rpm ची उर्जा निर्माण करू शकते. मात्र, सीएनजीवर मायलेज जास्त आहे. हे सीएनजीवर 31km पेक्षा जास्त मायलेज देऊ शकते. दिल्लीतील मारुति सुझुकी अल्टोची किंमत 3.39 लाख ते 5.03 लाख रुपये आहे. या किंमती एक्स शोरूम आहेत. मारुति सुझुकी अल्टोच्‍या सर्व प्रकारच्‍या मॉडेलची किंमत जाणून घ्या


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मारुती सुझुकी अल्टोच्या सर्व प्रकारांच्या किमती


  • ALTO STD (O) - रु. 3.39 लाख

  • ALTO LXI(O)s - रु 4.08 लाख

  • ALTO VXI- 4.28 लाख रुपये

  • ALTO VXI Plus- 4.41 लाख रुपये

  • ALTO LXI (O) CNG - रु 5.03 लाख


मारुति सुझुकी अल्टोचा सर्वात स्वस्त प्रकार अल्टो STD (O) आहे. ज्याची एक्स-शोरूम किंमत 3.39 लाख रुपये आहे. याला दोन एअरबॅग मिळतात. त्यामुळे पूर्वीपेक्षा थोडे अधिक सुरक्षित आहे. यापूर्वी, अल्टोचा सर्वात स्वस्त प्रकार अल्टो STD होता, जो फक्त एक एअरबॅगसह आला होता. तथापि, कंपनीने ते मॉडेल बंद केले आहे. सध्या सर्वात कमी व्हेरियंटमध्ये दोन एअरबॅग आहेत. याशिवाय रिव्हर्स पार्किंग सेन्सर, एबीएस विथ ईबीडी, सीट बेल्ट रिमाइंडर आणि स्पीड अलर्ट सिस्टीमही उपलब्ध आहेत.