Redmi K50i 5g Launch Date And Expected Specification: रेडमी जवळजवळ दोन वर्षांनी भारतात नवीनतम K-सिरीज स्मार्टफोन लाँच करण्यासाठी सज्ज आहे. त्यामुळे मोबाईलप्रेमींची प्रतीक्षा संपणार आहे. रेडमी देशात उद्या म्हणजेच 20 जुलै रोजी दुपारी 12 वाजता नवीन Redmi K50i लाँच करणार आहे. इच्छुक दर्शक रेडमी इंडियाच्या यूट्युबवर चॅनेल आणि सोशल मीडिया पेजवर थेट कार्यक्रम पाहू शकतात. कंपनीने ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अॅमेझॉनवर एक समर्पित मायक्रो-साइट तयार केली आहे. म्हणजेच फोन लाँच झाल्यानंतर या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Redmi K50i 5G ची अपेक्षित किंमत


Redmi K50i च्या बेस 6GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत 24,000 रुपये ते 28,999 रुपये असू शकते. हा एक अंदाज असल्याने वाचकांनी ब्रँडच्या अधिकृत घोषणेची प्रतीक्षा करावी.


Redmi K50i 5G अपेक्षित वैशिष्ट्ये


बीजीआर इंडियाच्या अहवालानुसार, Redmi K50i 6.6-इंचाच्या IPS LCD डिस्प्लेसह येण्याची शक्यता आहे. जो फुल HD+ रिझोल्यूशन आणि 144Hz रिफ्रेश रेट ऑफर करतो. हे MediaTek Dimensity 8100 chipset द्वारे समर्थित असण्याची अपेक्षा आहे. स्टोरेजच्या बाबतीत, स्मार्टफोन 8GB रॅम आणि 128GB अंतर्गत स्टोरेज देऊ शकतो. Redmi K50i Android 13-आधारित MIUI 13 वर आधारित असू शकतो. पाणी आणि धूळ प्रतिरोधासाठी IP53 रेटिंगसह देखील येऊ शकतो. यात 3.5 मिमी हेडफोन जॅक, ब्लूटूथ 5.3 आणि व्हीसी लिक्विड कूलिंग देखील अपेक्षित आहे. हे डॉल्बी व्हिजन सामग्रीसाठी समर्थनासह असेल, अशी अपेक्षा आहे.


Redmi K50i 5G कॅमेरा


Redmi K50i मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये 64MP प्राथमिक सेन्सर, 8MP वाइड-एंगल लेन्स आणि 2MP मॅक्रो सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी, हे 16MP फ्रंट-फेसिंग कॅमेरासह असेल असं बोललं जातं.


Redmi K50i 5G बॅटरी


अहवालानुसार, Redmi K50i मध्ये 5,080mAh ची बॅटरी 67W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल अशी अपेक्षा आहे. हँडसेट 163.6×74.3×8.8 मिमी आणि 200 ग्रॅम वजनाचा असण्याची शक्यता आहे.