How to Check if my Smartphone Supports 5G : 5G स्पेक्ट्रमचा लिलाव पूर्ण झाला आहे. जिओ (Jio), एअरटेल (Airtel) आणि व्होडाफोन-आयडिया (Vodafone Idea) या खाजगी टेलिकॉम कंपन्या भारतात  5G सेवा सुरु करण्यासाठी उत्सूक आहेत.  या महिन्याच्या अखेरीस भारतात 5G रोलआउट सुरू होऊ शकतं. यामुळे स्मार्टफोन यूझर्समध्ये कमालीची उत्सुकता आहे. (know step by step how to check your smartphone supports 5g)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जवळपास सर्वच स्मार्टफोन वापरतात. त्यामुळे 5G लॉन्चिंगच्या पार्श्वभूमीवर आपल्या मोबाईलमध्ये 5 जी सपोर्ट होणार का, असा प्रश्न जवळपास प्रत्येक स्मार्टफोन यूझर्सला पडला आहे. त्यामुळे तुमच्या मोबाईलमध्ये 5 जी चालणार की नाही, हे आपण स्टेप बाय स्टेप जाणून घेऊयात.


जबरदस्त असणार 5G स्पीड


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वातंत्र्य दिनी केलेल्या भाषणात लवकरच 5 G सेवा सुरुवात करणार असल्याचं सांगितलं होतं. तसेच 5Gचा वेग हा 4G तुलनेत दहापट अधिक असेल, असंही मोदींनी सांगितलेलं.   


मोबाईलमध्ये  5G सपोर्ट होणार की नाही?


- स्मार्टफोनच्या सेटिंग्समध्ये जा. 


-'वाईफाई एंड नेटवर्क' या पर्यायावर क्लिक करा. 


-'सिम एंड नेटवर्क' या ऑपशनवर क्लिक करा.


-'प्रेफर्ड नेटवर्क टाइप' इथे यादी दिसेल.


- तुमच्या मोबाईलमध्ये  5G सपोर्ट असेल, तर 2G/3G/4G/5G असं दिसेल.