Escalator च्या किनाऱ्याला का असतात हे ब्रश? 99 % स्कॉलरही उत्तर देण्यात अपयशी
त्याचा खरा वापर कशासाठी होतो माहितीये ?
मुंबई : एखादा मॉल, रेल्वे स्थान किंवा मेट्रो- मोनेचं (Mall, Railway, metro, Mono station) स्थानक पाहिलं तर तिथे स्वयंचलित जिने अर्थात एस्कलेटरचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. अनेकदा तर या स्वयंचलित शिड्यांचा वापर करताना नवख्यांची भंबेरी उडते. तुम्ही कधी या एस्कलेटरचं निरीक्षण केलंय का? अनेकांनीच केलं असेल. (Escalator Brush Function)
एस्कलेटरच्या किनाऱ्याला दोन्ही बाजूंना बारीक दात असणारे ब्रश लागलेले तुम्हाला दिसले असतील. अनेकजण तर त्यांचे बूट, चप्पल स्वच्छ करतानाही तुम्ही एखाद दिवस पाहिलं असेल. हा या ब्रशचा पूर्णपणे चुकीचा वापर आहे. (know the Purpose of Brush on Escalator)
Escalator च्या किनाऱ्याला असणारे ब्रश हे आपल्याच सुरक्षिततेसाठी लावण्यात आलेले असतात. आता तुम्ही म्हणाल, की हे ब्रश आपली सुरक्षा कशी बरं करणार? तर, Escalator ला असणारे ब्रश वॉल आणि साईडमध्ये असणारी रिकामी जागा भरण्यासाठी लावलेले असतात.
एस्कलेटरमध्ये एखादी गोष्ट अडकल्यास ते बंद पडण्याची शक्यता असते. अशा वेळी तिथं असणाऱ्या ब्रशचा वापर बूट, चप्पल किंवा इतर कोणतीही लहानमोठी वस्तू त्यात अडकू न देण्यासाठी केला जातो. चुकूनही एस्कलेटरवर एखादी वस्तू पडल्यास ब्रश तिला आतल्या रिकाम्या जागेत अडकण्यापासून वाचवतो आणि मोठा अपघात टळतो.