मुंबई : आज अनेकांच्या व्हॉटसॅऍप स्टेटसवर हा व्हिडीओ पुढील स्टेटससह व्हायरल होत आहे... 'आज मंदिर, मस्जिद डुब रहे है, वर्दी में तो आज...भगवान घुम रहे है'...कोल्हापुरातील महापुराचा हा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, यात एनडीआरएफ आणि लष्काराच्या जवानांनी मदत कार्य सुरू केलं आहे.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यात एक महिला अनेक दिवसांपासून आपल्या लहान मुलांसह अन्नपाण्यावाचून अडकली होती. अशा स्थितीत अखेर जवान तिच्या मदतीला देवदुताप्रमाणे धावून आले. जेव्हा या महिलेला बोटीने सुरक्षित स्थळी पोहोचवले. तेव्हा तिच्या भावना अनावर झाल्या, जवानांच्या पायांना हात लावून तिने त्यांचे आभार मानले. 

ही महिला काहीच बोलत नसली, तरी तिचा चेहरा खूप काही सांगत होता. 'झी २४ तास'चे कोल्हापूरचे व्हिडीओ जर्नलिस्ट मिथुन राजाध्यक्ष, तसेच कोल्हापूरचे 'झी २४ तास'चे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी ही पुराची भयानकता सांगणारी दृश्य अचूक टिपली.

ही दृश्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. महाराष्ट्रातील अनेक राजकीय, सामाजिक आणि प्रशासनात काम करणाऱ्या लोकांनी हा व्हिडीओ सर्वत्र शेअर केला आहे. तसेच झी मीडियाचे विविध ठिकाणी काम करत असलेल्या प्रतिनिधींना प्रेक्षक हा व्हिडीओ पाठवत आहेत.