लॅम्बॉर्गिनीच्या `उरूस`चं मुंबईमध्ये लॉन्चिंग
इटलीमधली आघाडीचे कारमेकर लॅम्बॉर्गिनीच्या पहिल्या सुपर स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल `ऊरूस`चं लाँचिंग मुंबईमध्ये झालं.
मुंबई : इटलीमधली आघाडीचे कारमेकर लॅम्बॉर्गिनीच्या पहिल्या सुपर स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल 'ऊरूस'चं लाँचिंग मुंबईमध्ये झालं. या कारची किंमत सुमारे 3 कोटी रुपये आहे. या नव्या मॉडेलमुळे भारतातल्या विक्रीमध्ये आडीच ते तीन पटींनी वाढ होण्याची आशा कंपनीला आहे.
मुंबईमध्ये झालेल्या ऊरूसच्या लाँचिंगला भारतीय बाजारपेठ लॅम्बॉर्गिनीसाठी महत्त्वाची असल्याचं कंपनीच्या आशिया पॅसिफीक क्षेत्राचे महाव्यवस्थापक अँड्री बाल्डी यांनी म्हटलंय. कंपनी भारतामध्ये स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल सेगमेंटवर अधिक लक्ष केंद्रीत करणार असल्याचं लॅम्बॉर्गिनी इंडियाचे प्रमुख शरद अग्रवाल यांनी म्हटलंय.