मुंबई : अॅपलने आयफोनच्या १० व्या वर्षपूर्तीनिमित्त ३ स्मार्टफोनचं एकत्रितपणे लॉन्चिंग केलं. मंगळवारी कॅलिफोर्नियात झालेल्या कार्यक्रमात अॅपलने आयफोन ८, आयफोन ८ प्लस आणि स्पेशल वर्षपूर्तीनिमित्त आयफोन टेन लॉन्च केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवनवीन फिचर्स असलेल्या या फोनची आयफोनप्रेमींना प्रचंड उत्सुकता होती. ६९९ डॉलरचा हा सर्वात अॅडवॉन्स स्मार्टफोन आहेत. चेह-याद्वारे अनलॉक होणारा आयफोन टेनची किंमत ९९९ डॉलर असेल. तीन नोव्हेंबरपासून आयफोनच्या सर्व आवृत्ती बाजाराता उपलब्ध होणार आहेत. भारतात हे फोन कधी येणार किंवा त्याची किंमंत नेमकी किती असेल हे आताच स्पष्ट होऊ शकलेलं नाही.  एक अॅपलचे मुख्य कार्यकारी टीम कुक यांनी या शानदार सोहळ्यात हे तिन्ही फोन लॉन्च करतानाच स्मार्ट वॉच आणि थर्ड सिरिजची अॅपल ४ के टीव्हीसुद्धा लॉन्च केला.