फक्त 11 रुपयात खरेदी करता येणार Bluetooth हेडफोन्स, जाणून घ्या कसं ते
खरचं इतका स्वस्त मिळतोय, फक्त 11 रुपयांत Bluetooth हेडफोन्स,ऑफर जाणून घ्या
मुंबई : अनेक ऑनलाईन साईट्स सणानिमित्त अनेक वस्तुंवर भरघोस सुट देत असतात. आताच पार पडलेल्या गणेशोत्सवात देखील या कंपन्याने भन्नाट ऑफर्स दिल्या होत्या. मात्र आता गणेशोत्सव सण पार पडून सुद्धा ऑनलाईन साईट्सवर भन्नाट ऑफर मिळतेय. एका मोबाईल कंपनीने Bluetooth हेडफोन्स भरघोस सुट दिलीय. नेमकी ही ऑफर काय आहे ते जाणून घेऊयात.
प्रसिद्ध मोबाईल कंपनी लावाने नवीन इअरफोन लॉन्च केले आहेत. कंपनीचा N-सीरीजमधील हा दुसरा इअरफोन आहे. कंपनीने बजेट सेगमेंटमध्ये Lava Probuds N11 वायरलेस इअरफोन लॉन्च केले आहेत. या इअरफोनमध्ये ड्युअल कीस्विच फंक्शन आहे.
बॅटरी लाईफ किती?
लावाचा असा दावा आहे की, हे इअरफोन एका चार्जवर 42 तासांची बॅटरी लाइफ देईल. तसेच या इअरफोनवर उत्कृष्ट कॉलिंग अनुभव मिळेल.
11 रुपयात कस खरेदी करता येणार?
Lava च्या Probuds N11 earbuds ची किंमत 1,499 रुपये आहे. पण त्याची प्रास्ताविक किंमत खूप खास आहे. कंपनी हा इअरफोन फक्त 11 रुपयांना विकणार आहे. 10 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता Amazon साईटवर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. लिमिटेड ऑफरमध्ये हा इअरफोन खरेदी करता येणार आहे.
इतर ऑफर काय?
Lava Probuds N11 इअरफोन 13 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर या कालावधीत 999 रुपयांच्या किमतीत उपलब्ध असतील. तर 17 सप्टेंबरपासून याच इअरफोनसाठी 1,499 रुपये खर्च करावे लागतील. यासह तुम्हाला NeckBank वर एक वर्षाची वॉरंटी मिळेल. तसेच वापरकर्त्यांना गाना अॅपचे सबस्क्रिप्शनही मिळेल.
फिचर्स
- Lava Probuds N11 मध्ये 12mm ड्रायव्हर आहे, जो ड्युअल हॅल्सविचसह येतो.
- इअरबड्समध्ये व्हॉईस असिस्टंट सपोर्ट मिळेल.
- इअरबड्स कॉल प्ले/पॉज करण्यासाठी किंवा उत्तर देण्यासाठी एक बटण मिळेल.
- टर्बो लेटन्सी आणि प्रो गेम मोड आहे.
- इयरफोनमध्ये 280mAh बॅटरी मिळणार आहे. यात क्विच चार्जिंगची सुविधाही आहे.
- लावाचा असा दावा आहे की, हे इअरफोन एका चार्जवर 42 तासांची बॅटरी लाइफ देईल.
- तुम्ही Kai Orange, Firefly Green आणि Panther Black पँथर ब्लॅक रंगांमध्ये इअरफोन खरेदी करू शकता.
Lava Probuds N11 हे इअरफोन 11 रूपयात Amazon साईटवर मिळत आहेत. ही ऑफऱ लिमिटेड असणार आहे. त्यामुळे एका वेळेनंतर तुम्हाला हा इअरफोन इतक्या स्वस्तात खरेदी करता येणार नाही आहे. त्यामुळे तुम्हाला जर इअरफोन खरेदी करायचा असेल तर आताच खरेदी करा.