मुंबई : स्मार्टफोन कंपनी 'लेनोवो'ने (Lenovo) सोमवारी 'लेनोवो के१० प्लस' (Lenovo K10 Plus) स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. या नव्या स्मार्टफोनची किंमत १० हजार ९९९ रुपये इतकी आहे. ३० सप्टेंबर २०१९ पासून, 'लेनोवो के१० प्लस' विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. 


काय आहेत Lenovo K10 Plusची वैशिष्ट्ये -


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- ऑपरेटिंग सिस्टम  Android 9.0
- ऑक्टाकोर प्रोसेसर, क्वालकॉम एसडीएम ६३२, १.८ GHz, Adreno ५०६
- ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटरनल मेमरी
- ६.२२ इंची HD+ डिस्प्ले, २.५ D Glass, ८७% स्क्रीन टू बॉडी रेशियो
- ४०५० एमएएच नॉन-रिमूव्हल बॅटरी
- मोबाइल लवकर चार्ज होण्यासाठी १० वॅट रॅपिड चार्जिंग सिस्टम 
- १३ MP + ५ MP + ८ MP रीयल कॅमेरा सेटअप
- सेल्फीसाठी १६ मेगापिक्सल फ्रन्ट कॅमेरा
- 'लेनोवो के१० प्लस'मध्ये फिंगरप्रिंट रीडरही देण्यात आला आहे.


स्मार्टफोनचा ट्रिपल कॅमेरा सेटअप आर्टिफिशियल इंटेलिजेन्सवर आधारित आहे. कंपनीला हा स्मार्टफोन तरुणांच्या पसंतीस उतरेल असा विश्वास आहे. जवळपास संपूर्ण दिवस चालेल असा बॅटरी बॅकअपही फोनला देण्यात आल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.