परवडणाऱ्या किंमतीत MOTO G8 स्मार्टफोन लॉन्च; जाणून घ्या काय आहेत फिचर्स
9 हजाराच्या आत MOTO G8 स्मार्टफोन लॉन्च...
नवी दिल्ली : देशात चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनदरम्यान आता कंपन्यांनी आपले प्रोडक्ट बाजारात विक्रीसाठी आणण्यास सुरुवात केली आहे. यादरम्यान मोबाईल निर्माता कंपनी लेनोवोने आपल्या प्रसिद्ध ब्रँड मोटोरोलाचा Motorolaचा नवा स्मार्टफोन बाजारात लॉन्च केला आहे. याचे फिचर्स आणि किंमती दोन्हीही सामान्यांसाठी बजेटमध्ये ठरु शकतात.
मोटोरोलाने गुरुवारी मोटो जी 8 पॉवर लाईट स्मार्टफोन लॉन्च केला. हा फोन 8,999 रुपयांत बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. या फोनला 5000 एमएचची बॅटरी आणि ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन रॉयल ब्लू आणि आर्कटिल ब्लू रंगात उपलब्ध आहे. 29 मेपासून मोटोरोलाच्या अधिकृत वेबसाईटसह फ्लिपकार्टवरही MOTO G8 विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.
काय आहेत MOTO G8चे फिचर्स -
- 1600*720 रिझोल्युशन
- 6.5 इंची एचडी प्लस आयपीएस एलसीडी डिस्प्ले
- ऑक्टा-कोर प्रोसेसर
- 4 जीबी रॅम
- ऍन्ड्राईड 9.0 पाय Android 9 Pie
- मायक्रो एसडी कार्ड स्टोरेज 256 जीबीपर्यंत वाढवता येऊ शकतं
- ड्यूल 4 जी वीओएलटीई volte
- ब्लूटूथ
- हेड फोन जॅक
- एफएम रेडिओ
- फिंगरप्रिंट स्कॅनर
- मायक्रो यूएसबी पोर्ट
कॅमेरा -
MOTO G8ला ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे.
- फ्लॅश लाईटसह 16 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा
- 2 मेगापिक्सल मॅक्रो लेन्स
- 2 मेगापिक्सल डेप्थ सेन्सर
- सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिगंसाठी 8 मेगापिक्सल फ्रन्ट कॅमेरा