मुंबई : सध्या स्मार्टफोनमध्ये मोठी स्पर्धा पाहायला मिळत आहे. फोर टीबी स्टोरेजचा तगडा फोन स्मार्टफोन येतोय. त्यामुळे या फोनमुळे स्पर्धेत वाढ होईल. लेनोव्हो या कंपनीचा ४ टीबी इनबिल्ट स्टोरेजचा तगडा Lenovo Z5 बाजारात येत आहे. लेनोव्हो झेड ५मध्ये एआय फीचर्स असलेला ड्युएल कॅमेरा सेटअप असणार आहे. कंपनीने या फोनचा पहिलाच टिझर प्रदर्शित केलाय. त्यात 'पार्टिकल टेक्नोलॉजी'सह ४ टीबी स्टोरेज देणार असल्याचं सांगितले आहे.  


पेईचिंगच्या चायना फिल्म डायरेक्टर सेंटरमध्ये हा फोन लाँच करण्यात येणार आहे. बेझल-लेस डिस्प्ले ही या फोनची खासियत आहे. स्क्रीन-टू-बॉडी रेशियो ९५% टक्क्यांपर्यंत असणार आहे. फोनमध्ये २,००० एचडी व्हिडिओ, दीड लाख गाणी आणि दहा लाख फोटो सेव्ह करता येऊ शकतात. मेटल फ्रेम, ग्लास बॉडी, आणि व्हर्टिकल ड्युएल कॅमेराही असणार आहे. मात्र, या फोनची किंमत जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, लाखाच्या घरात असण्याची शक्यता आहे.