Lexus LS 500h: भारतात जानेवारीत लॉन्च होणार ही शानदार कार
जपानी लक्झरी कारमेकर कंपनी लेक्सस आपली ग्लोबल रेंज टॉपिंग मॉडल, एलएस सिडेन भारतात लॉन्च करणार आहे.
नवी दिल्ली : जपानी लक्झरी कारमेकर कंपनी लेक्सस आपली ग्लोबल रेंज टॉपिंग मॉडल, एलएस सिडेन भारतात लॉन्च करणार आहे. ही कार भारतात जानेवारी २०१८ मध्ये लॉन्च करणार आहे. भारतात येणा-या या मॉडेलचं नाव एलएस ५००एच असून ही कार हायब्रिड मॉडल आहे. ही कार ५.२ मीटर लांब आणि या कारचा व्हिलबेस ३.१ मीटरचा आहे.
शानदार इंटेरिअर
इंटेरिअरबाबत सांगायचं तर ही कार टिपिकल लेक्सस डिझाईनपेक्षा वेगळी आहे. कॅबिनमध्ये जबरदस्त क्वॉलिटीच्या मटेरिअलचा वापर करण्यात आलाय. फ्रन्टला बसणा-यांना हिटींग, कूलिंग आणि मसाज फंक्शनच्या सीट्स मिळतील. या इलेक्ट्रिक सीट २८ वेगवेगळ्या प्रकारे अॅडजस्ट होऊ शकतील.
मर्सिडीजसोबत स्पर्धा
लेक्सस या गाडीला भारतात मर्सिडीज मेबॅक एस५०० च्या स्पर्धेत उतरवणार आहे. लेक्ससचा दावा आहे की, या गाडीत अॅक्टीव्ह नॉईज सप्रेशन तंत्राचा वापर करण्यात आला आहे. ज्यामुळे कार जुन्या मॉडल्सच्या तुलनेत अधिक शांत तयार केल्या जातात.
इंजिन आणि पावर
या गाडीत ३.५ लीटरचं व्ही६ इंजिन देण्यात आलं आहे. तसेच यात दोन इलेक्ट्रीक मोटर्स सुद्धा देण्यात आल्यात. दोन्ही मिळून ३५४ हॉर्सपावरची ताकद निर्माण करतात. इंटरनॅशनल मार्केटमध्ये ही गाडी लॉन्च आधीच विकली जात आहे.
किती असेल किंमत?
लेक्सस ही कार भारतात इम्पोर्ट करणार आहे. या कारची किंमत बीएमडब्ल्यू, जॅग्वार आणि मर्सिडीज बेंझ या कार्सपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. या कारची अंदाजे एक्स शोरूम किंमत १.५ कोटी रूपयांपेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे. लेक्ससने या कारची बुकींग सुरू केली आहे.