नवी दिल्ली : मोबाईल टेक्नोलॉजी क्षेत्रामध्ये आपण गेल्या काही वर्षात खूप सारे अविष्कार पाहिले आहेत. किपॅड वाल्या फोन पासून ते स्क्रिन टच फोन पर्यंत तर  2जी, 3जी आणि 4 जी पर्यंतचा स्मार्टफोनचा प्रवासही आपण पाहतोय. पण आता 2019 हे वर्ष मोबाईल टेक्नोलॉजी क्षेत्रासाठी हा उंबरठा पार करणारे ठरणार आहे. गेल्यावर्षभर चर्चा असलेले 5 जी तंत्रज्ञान तुमच्या पर्यंत पोहोचण्यास आता काही दिवसांचाच कालावधी राहीला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


2019 वर्षामध्ये नवनव्या टेक्नोलॉजी येणार असल्या तरी जास्त आतुरता आहे ती म्हणजे फोल्डेबल फोन आणि 5 जी फोनचीच. अनेक कंपन्या आता 5 जी स्मार्टफोनवर काम करत असून तो लॉंचिग करण्याच्या प्लानिंगमध्ये आहेत. पण या सर्वांमध्ये एलजी इलेक्ट्रॉनीक्सने बाजी मारली आहे. 



24 फेब्रुवारीला आपण 5 जी फोन लॉंच करणार असल्याची घोषणा केली आहे. बार्सिलोनामध्ये होणाऱ्या मोबाईल वर्ल्ड कॉंग्रेस ( एमडब्ल्यूसी) दरम्यान हा स्मार्टफोन लॉंच केला जाणार आहे. त्यानंतर 25 ते 28 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या मोबाईल वर्ल्ड कॉंग्रेस (MWC 2019) दरम्यान प्रदर्शनासाठी ठेवला जाणार आहे. 



एलजी व्यतिरिक्त सॅमसंग, वनप्लस, शाओमी, हुवावे आणि ओप्पो सारख्या कंपन्या देखील 5 जी फोनवर काम करत आहेत. या कंपन्या देखील आपला स्मार्टफोन आपला 5 जी स्मार्टफोन लवकरच लॉंन्च करणार आहेत.