या माणसाचा व्हिडीओ तुम्ही ऐकाल तर थक्क व्हाल!
यूट्यूबवर त्यांचे काही व्हिडीओ आहेत, ते अनेक शहरात पाण्याविषयी लोकांमध्ये जनजागृती करतात.
मुंबई : या व्हिडीओत जी व्यक्ती बोलतेय त्यांचं नाव संजीवनी लांजेवार असल्याचं कळतंय, ते आर्ट ऑफ लिव्हिंगच्या जल जागृती अभियानसाठी काम करतात, त्यांनी पाण्याविषयी आपले विचार अतिशय सोप्या भाषेत मांडलेले आहेत, यूट्यूबवर त्यांचे काही व्हिडीओ आहेत, ते अनेक शहरात पाण्याविषयी लोकांमध्ये जनजागृती करतात.
खेडी का ओसाड होत आहेत, पाण्यामुळे नेमके काय काय परिणाम होत आहेत, याविषयी ते भरभरून बोलतात. त्यांचे विचार नेटीझन्सना भावतात, त्यामुळेच की काय ते इंटरनेटवर खासकरून यूट्यूबर लोकप्रिय होताना दिसत आहेत.