Login without Password: आजकाल प्रत्येकाला अनेक अगदी अनेक प्रकारचे पासवर्ड (Passwords) लक्षात ठेवावे लागतात. बँकेचे (Bank) अॅप्स असो की मोबाईल (mobile) उघडण्यापासून त्यातील अॅप्स असो अगदी ऑफिस कामासाठी वापरण्यात येणारे मेल असो किंवा लॅपटॉप, पीसी असो प्रत्येक गोष्टीसाठी आजकाल पासवर्ड लागतो. पासवर्डशिवाय कुठलेही गोष्ट होत नाही, असं म्हटलं तर वावग ठरणार नाही.  मग अनेकांची ही समस्या असते इतकी पासवर्ड कसे लक्षात ठेवायचे...मग आपण ते प्रत्येक वेळी रिसेट करतो. तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. 


गुगलचं भन्नाट फीचर (google feature)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 गुगलने (Google) एक नवीन फीचर लॉन्च केलं आहे. जे मागील वर्षी आलेल्या मायक्रोसॉफ्ट-ऍपलच्या फीचरसारखंच आहे. Google ने Android डिव्हाइसेस आणि Chrome साठी नवीन 'Passkey' वैशिष्ट्य लॉन्च केलं आहे जे सध्या चाचणी टप्प्यात आहे. या वैशिष्ट्याचा उद्देश वापरकर्त्यांच्या खात्यांना चांगली सुरक्षा देणे आणि लॉगिन प्रक्रिया सुलभ करणे हा आहे. (Login without Password and Google nmp)


अ‍ॅप्स-वेबसाइट्स पासवर्डशिवाय उघडतील! (Login without Password)


आता यापुढे तुम्ही तुमच्या सर्व अॅप्स आणि वेबसाइट्सवर पासवर्डशिवाय लॉग इन करू शकाल. या वैशिष्ट्यासह, वापरकर्ते त्यांच्या Android डिव्हाइसवरून अॅप्स आणि वेबसाइट्स सिंक करण्याच्या त्रासाशिवाय, पासवर्डची आवश्यकता न ठेवता 'पासकी' (Passkey) वापरून सहजपणे लॉग इन करू शकतील.


कसा वापरायचा आहे फीचर


सध्या हे फीचर अॅप डेव्हलपर्ससाठी जारी करण्यात आलं आहे. गुगलचे म्हणणे आहे की, हे फीचर उर्वरित वापरकर्त्यांसाठी वर्षाच्या अखेरीस लॉन्च केलं जाईल. आता हे वैशिष्ट्य वापरण्याचा मार्ग कोणता आहे ते समजूया. तुम्हाला फक्त Google खाते निवडून आणि नोंदणीकृत फिंगरप्रिंट (fingerprint) किंवा फेस (Face) अनलॉकसह प्रमाणीकरण पूर्ण करून तुमच्या Android स्मार्टफोनवर एक पासकी तयार करायची आहे.