सरकारने लॉन्च केले mAadhaar अॅप, आता स्मार्टफोनमध्ये ठेवा आपले `आधार`
सरकारने डिजीटल इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी mAadhaar अॅप लॉन्च केले आहे. हे अॅप अँड्रॉईड प्लॅटफॉर्मवर चालणार आहे. अॅप डाऊनलोड केल्यानंतर युजर्सला पेपर फॉर्मेटमध्ये आधारकार्ड कॅरी करण्याची गरज नाही.
नवी दिल्ली : सरकारने डिजीटल इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी mAadhaar अॅप लॉन्च केले आहे. हे अॅप अँड्रॉईड प्लॅटफॉर्मवर चालणार आहे. अॅप डाऊनलोड केल्यानंतर युजर्सला पेपर फॉर्मेटमध्ये आधारकार्ड कॅरी करण्याची गरज नाही.
या अॅपला UIDAI (युनिक आइडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया) ने तयार केले आहे. अॅपमध्ये युजर्स नेम, जन्मतारीख, लिंग, पत्ता, फोटो आणि आधार नंबर लिंक असेल.
गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करा अॅप
या mAadhaar अॅपला गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करता येणार आहे. लवकरच हे अॅपलच्या iOS वर्जनपण लॉन्च करण्यात येणार आहे. या अॅपचा वापर करण्यासाठी युजर्सला रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. तुमच्याकडे नंबर रजिस्टर्ड नाही तर जवळच्या आधार कार्ड नोंदणी केंद्रात जाऊन युजर्सने नोंदणी करावी लागणार आहे.
मोबाईलमध्ये कॅरी करा आपले आधारकार्ड
पर्सनल डाटा सुरक्षित राहण्यासाठी अॅपमध्ये बायोमॅट्रीक लॉकिंग आणि अनलॉकिंग सिस्टम देण्यात आली आहे. अॅपमध्ये TOTP सिस्टिम देण्यात आली आहे. यात ऑटोमॅटिकली टेम्पररी पासवर्ड जनरेट करण्यात येणार आहे. या अॅपद्वारे तुम्ही तुमचे प्रोफाईलपण अपडेट करू शकणार आहात. या अॅपनंतर युजर्सला आधारकार्डची हार्ड कॉपी आपल्यासोबत ठेवण्याची गरज नाही.