ठरलं! महिंद्रा 5 इलेक्ट्रिक एसयूव्ही 15 ऑगस्टला करणार सादर, जाणून घ्या कधीपर्यंत मिळणार
भारतीय कंपनी महिंद्राही कारप्रेमींना भेट देण्याच्या तयारीत आहे. कंपनी पुढील महिन्यात पाच इलेक्ट्रिक एसयूव्ही भारतात सादर करणार आहे.
Mahindra New Electric SUV set for Unveiling:लॉकडाऊननंतर पुन्हा एकदा ऑटो क्षेत्र रुळावर येण्यास सुरुवात झाली आहे. एका पेक्षा एक सरस गाड्या गेल्या काही दिवसात लाँच होणार आहेत. यामुळे कारप्रेमींमध्ये नेमकी कोणती गाडी घ्यायची? हा प्रश्न पडला आहे. ह्युंदाईपासून एमजीपर्यंत अनेक कंपन्या भारतात इलेक्ट्रिक वाहनं तयार करत आहेत. आता भारतीय कंपनी महिंद्राही कारप्रेमींना भेट देण्याच्या तयारीत आहे. कंपनी पुढील महिन्यात पाच इलेक्ट्रिक एसयूव्ही भारतात लाँच करणार आहे. महिंद्रा अँड महिंद्रा 15 ऑगस्ट रोजी भारतात 5 इलेक्ट्रिक एसयूव्ही लाँच करणार आहे. त्यामुळे कारप्रेमींकडे अनेक पर्याय उपलब्ध होणार आहेत.
विशेष म्हणजे, आगामी एसयूव्हीमध्ये फूल साईज एसयूव्ही नाही तर कॉम्पॅक्ट आणि मिडसाईज तसेच कूप स्टाइल एसयूव्हीचा समावेश असणार आहे. महिंद्रा आपल्या इंधन कारमुळे भारतात खूप लोकप्रिय आहे आणि आता कंपनी इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये प्रवेश करण्यासाठी जोरदार तयारी करत आहे. कंपीनीचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनीही ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे.
कंपनीने आपल्या इलेक्ट्रिक सेगमेंटसाठी 'बॉर्न इलेक्ट्रिक सीरीज' आणली आहे. या मालिकेत एकूण 7 नवीन इलेक्ट्रिक कार भारतीय ग्राहकांसाठी लाँच केल्या जाणार आहेत. यापैकी 5 इलेक्ट्रिक एसयूव्ही लाँच करण्यासाठी भारतीय ग्राहकांना एक वर्षाहून अधिक काळ प्रतीक्षा करावी लागेल. या गाड्या 2025 पर्यंत भारतात मिळतील, अशी अपेक्षा आहे. भारतात 15 ऑगस्टची निवड करून, कंपनी आपल्या ग्राहकांना भारतीय असल्याचा अभिमान वाटेल अशी तयारी करत आहे. कारण ही मेड इन इंडिया इलेक्ट्रिक कार आहे जी भारतीय रस्त्यांवर आपली अस्तित्व दाखवेल.
सादरीकरणादरम्यान इलेक्ट्रिक एसयूव्हीशी संबंधित इतर वैशिष्ट्यांची माहिती मिळेल. खरं तर, बाजारात आधीच इलेक्ट्रिक कार आहेत, ज्यांना थेट टक्कर देण्याची महिंद्राची तयारी आहे, त्यामुळे रेंज अधिक असण्याची अपेक्षा आहे, यासोबतच महिंद्राची सुप्रसिद्ध डिझाईनही या एसयूव्हीमध्ये पाहायला मिळेल.