Mahindra Car : भारतीय वाहन उत्पादक कंपनी महिंद्रा आणि महिंद्रा बाजारात दमदार कामगिरी करत आहे. ही कंपनी प्रामुख्याने एसयूव्ही वाहनांच्या सेगमेंमटध्ये वर्चस्व राखून आहे. ही कंपनी आता त्यांची सर्वाधिक विकली जाणारी कार महिंद्रा बोलेरोचं नवीन मॉडेल लाँच केले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान भारतात कार मॉडिफिकेशनची (car modification) वेगळी क्रेझ आहे. काही लोक आपली वाहने हौशी पद्धतीने बदलतात, तर काहीजण त्यात आवश्यक ते बदल (Changes) करतात.


असेच एक प्रकरण समोर आले आहे. ज्यामध्ये महिंद्रा बोलेरोमध्ये (Mahindra Bolero) फेरफार करून मद्य तस्करीसाठी वापरला जात होता. हा फेरफार इतका आश्चर्यकारक होता की, महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनीही तुम्ही डिझाईन इंजिनिअर झाले असते असे सांगितले.


वास्तविक, हे प्रकरण बिहारमधील आहे, जिथे पोलिसांनी महिंद्रा बोलेरोमध्ये अवैध दारूची तस्करी करताना चार तस्करांना अटक केली. तथापि, या प्रकरणात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दारूच्या बाटल्या लपविण्याचा मार्ग. तस्करांनी या बाटल्या त्यांच्या महिंद्रा बोलेरोच्या छतामध्ये लपवून ठेवल्या होत्या.


त्यांनी बोलेरोच्या छतामध्ये 900 ते 1000 दारूच्या बाटल्या ठेवता येतील अशा पद्धतीने बदल केले होते. ते नेहमीच्या कारच्या छतासारखे दिसत होते.


अनेक दिवसांच्या प्रयत्नानंतर या तस्करांना पकडल्याचे पोलिसांनी (Police) सांगितले. याबाबत पोलिसांना एक टीप मिळाली. मात्र, गाडी पकडल्यानंतरही दारू कुठे लपवली होती, हे काही समजू शकले नाही.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोलेरोच्या छतामध्ये 20 डब्यांमध्ये 960 छोट्या बाटल्या लपवल्या होत्या. या बातमीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.



काय म्हणाले आनंद महिंद्रा?


आनंद महिंद्रा यांनी ही बातमी ट्विट करत म्हटलं की, जर या लोकांनी योग्य मार्गाचा अवलंब केला असता तर ते डिझाइन इंजिनिअर होऊ शकले असते. त्यांनी लिहिले, “हे लोक चुकीच्या मार्गावर गेले आहेत हे दुर्दैवी आहे. अन्यथा ते क्रिएटिव्ह ऑटोमोटिव्ह डिझाइन अभियंते होऊ शकले असते.”